शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आता नकाशावर दूषित पाण्याचे गाव!

By admin | Updated: March 6, 2017 01:54 IST

जीआयएस मॅपिंग प्रणाली; निरीक्षण विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणार!

बुलडाणा, दि. ५- पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक घटकांचे वाढलेले प्रमाण घातक आहे. ही बाब लक्ष घेऊन पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांच्या रासायनिक तपासणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. भूवैज्ञानिक विभागाच्यावतीने ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये १६७ जुन्या निरीक्षण विहिरींसह ११४६ नव्या निरीक्षण विहिरींची पाणी तपासणी केली जात आहे. यात दूषित पाणी नमुने आढळलेले गाव भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) द्वारे नकाशावर दर्शविण्यात येणार आहेत.काही गावांमध्ये पाण्यातील रासायनिक घटकांची तपासणी गतवर्षी करण्यात आली. यात प्रत्येकी चारशे स्रोतांचे नमुने तपासल्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये बाधित स्रोतांची संख्या व रासानियक घटकांचे प्रमाण वाढलेले आढळून आले. ही बाब गांभीर्याने घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विभागीय प्रयोगशाळा यांच्यामार्फत पिण्याच्या पाण्यातील एचपी, सॉलीड, फ्लोराइड, नाईट्रेड, आयर्न हे पाच घटक तपासण्यात आले. यात २५0 गावांचे जीआयएस मॅपिंग करण्याचे काम टप्याटप्यात पूर्णत्वास गेले आहे.यावर्षी १३ तालुक्यात १४२0 गावांतील ११४६ निरीक्षण विहिरींची नव्याने निवड करण्यात आली आहे. यातील नियमित पाणी तपासणी जलसुरक्षकांकडून केली जाणार आहे. पाणी नमुने गोळा करून जलसुरक्षकांकडून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविले जाणार आहे. ज्या गावांतील विहिरीचे पाणी नमुने दूषित आढळले, ते गाव जिल्ह्याच्या नकाशावर जीआयएस प्रणालीत दर्शविण्यात येणार आहे. याबाबात लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.    भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून चांगल्या आणि दूषित पाणी नमुन्याचे गाव जिल्ह्याच्या नकाशावर विविध रंगामध्ये दर्शविण्यात येते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित आहे, गुणवत्तापूर्ण आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ही बाब फायद्याची ठरते. शिवाय जिल्ह्याचे पेयजलाबाबतचे धोरण ठरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी उपलब्ध होते.काय आहे 'जीआयएस मॅपिंग'?पाण्याचे जैविक व रासायनिक असे दोन नमुने घेऊन ते प्रयोगशाळेमार्फत तपासून त्याचा पिण्यास वापर होत असल्याची निश्‍चित करण्यात येते. तसेच हंगामी, बारमाही, बंद असलेल्या जलस्रोत निश्‍चिती, यानंतर गाव, वस्ती, तांडे येथील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे अक्षांश, रेखांश काढणे, पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांना सांकेतांक देण्यात येते. त्याचबरोबर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची सद्यस्थितीविषयी नकाशे तयार करण्यात येते.