शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता बाजार समिती, सोसायट्यांच्या निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 11:30 IST

Election of market committees जिल्ह्यात सेवा सहकारी सोसायटी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या व सेवा सहकारी  निवडणुकींचे वेध लागले आहेत.  

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम संपत नाही तोच जिल्ह्यात सेवा सहकारी सोसायटी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या व सेवा सहकारी  निवडणुकींचे वेध लागले आहेत.  जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र कोरोनाचे संकट आल्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेगाव वगळता सर्वच बाजार समित्यांची मुदत संपली असून, त्या ठिकाणी प्रशासक काम पाहत आहेत. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत.     जिल्ह्यात या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. मात्र मध्येच कोरोनाचे संकट उद्भवल्याने या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली होती. आता कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गावागावात असलेल्या सेवा सहकारी, आदिवासी, विविध कार्यकारी व अन्य विविध सोसायट्याच्या कोरोनामुळे स्थगिती देण्यात आलेल्या तसेच निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे सूतोवाच  सहकार क्षेत्रातील नेत्यांनी केले आहे.  सहकार क्षेत्रातील नेते कामाला लागले असून, आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. गत तीन महिन्यात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन प्रशासक बदलण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक, सहकार क्षेत्रातील निवडणुकांचा प्रभाव जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील मातब्बर नेते सहकार क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण करण्याकरिता धडपडत असतात.   

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहे. बाजार समित्या व सोसायट्यांच्या निवडणुका ३१ मार्चनंतर होणार आहे. तोपर्यत प्रशासक काम पाहणार आहे. जिल्ह्यात शेगाव वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये प्रशासक काम पाहत आहेत. - महेंद्र चव्हाण, उपनिबंधक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावElectionनिवडणूक