शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आता स्वस्त धान्य दुकानात मिळणार भाजीपाला

By admin | Updated: October 22, 2016 18:09 IST

स्त धान्य दुकानदारांना कमिशनमधून दुकाने चालविणे परवडत नसल्यामुळे त्यांच्यावर आता भाजीपालाही विकण्याची वेळ आली आहे.

हर्षनंदन वाघ, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि.२२ -  स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशनमधून दुकाने चालविणे परवडत नसल्यामुळे त्यांच्यावर आता भाजीपाला घ्याहो...भाजीपाला.. अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याबाबत राज्य शासनाने रेशनदुकादारांना भाजीपाला विकण्याची मुभा दिली आहे.
रेशनदुकादारांना मिळणा-या कमिशनमधून दुकाने चालविणे परवडत नसल्यामुळे कमिशन वाढवून देण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने कमिशन वाढवून देण्याएवजी त्यांना अन्य वस्तू विक्री करण्याची परवानगी दिली आहे. रेशन दुकानात आतापर्यंत रॉकेल, साखर, डाळी, गहू, तांदूळ यांच्या विक्री करण्याची मुभा होती. राज्यात शासनाने भाजीपाला, फळांची विक्री नियममुक्त केली आहे. शेतकºयांना बाजार समित्यांशिवाय देखील फळे, भाजीपाला विक्री करता येणार असल्यामुळे या नियमानुसार रेशन दुकानदारांनाही भाजीपाला विक्री करता  येणार आहे. याबाबत शासनाने परवानगी दिली असून अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात आदेश शुक्रवारी जारी केला आहे.
 
 
दिवाळीनिमित्त रवा, मैदा, बेसनही विकणार
रेशन दुकानदारांना भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिली असून दिवाळीच्या मुहुर्तावर रवा, मैदा, बेसनही विकाता येणार आहे. मात्र या वस्तू विक्रीची परवानगी अस्थायी स्वरूपाची आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसात सर्वसामान्य व्यक्तींना रेशनदुकानात भाजीपाला शिवाय रवा, मैदा व बेसन विकत घेता येणार आहे.
 
 
रेशन दुकानदारांना कमिशनमधून दुकाने चालविणे परवडत नसल्यामुळे रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्या योजनेचा एक भाग म्हणून रेशन दुकानदारांना भाजीपाला विक्रीची परवानागी  देण्यात आली आहे. -राजेश अंबुसकर,, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकान संघटना, बुलडाणा.