शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता दुधातील भेसळ राेखणार जिल्हास्तरीय समिती

By संदीप वानखेडे | Updated: June 30, 2023 17:50 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती हाेणार स्थापन

बुलढाणा: राज्यात दुधात माेठ्या प्रमाणात भेसळ हाेते. या भेसळीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. तसेच दूध भेसळीमुळे जनतेच्या आराेग्यावर विपरीत परिणाम हाेताे. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा हाेण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थात हाेणारी भेसळ राेखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.राज्यात गत काही महिन्यात दुधात माेठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येत आहे. भेसळीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला याेग्य भाव मिळत नाही. तसेच दूध भेसळीमुळे जनतेच्या आराेग्यावर परिणाम हाेताे.

राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्णा दुधाचा पुरवठा व्हावा, यासाठी शासनाने जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दूध दर व दूध भेसळ प्रश्नाबाबत दूध उत्पादक, सहकारी व खासगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसाेबत २२ जून २०२३ राेजी पशुसंवर्धन व दु्ग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत दूध उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधी यांनी राज्यात दुधामध्ये माेठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येत असल्याची तक्रार केली हाेती. त्यानंतर राज्य शासनाने २८ जूनला शासन आदेश जारी करीत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी राहणार समिती

या समितीच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी राहणार आहेत. तसेच सदस्यपदी अपर पाेलिस अधीक्षक, जिल्ह्याचे सहायक आयुक्त अन्न व व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र हे राहणार आहेत. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी हे समितीच्या सचिवपदी राहणार आहेत.

धडक तपासणी माेहीम सुरू करण्याचे आदेश

दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ राेखण्यासाठी या समितीने धडक तपासणी माेहीम सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. भेसळती सहभाग असलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, दूध भेसळ करणाऱ्या व्यक्तीबराेबरच ते विकण्यासाठी स्वीकारणाऱ्या व्यक्ती किंवा दुकानदारालाही सह आराेपी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या समितीच्या कार्यावर दुग्ध व्यवसाय विकास व अन्न, औषध प्रशासनाच्या आयुक्त यांच्यामार्फत संयुक्तपणे कण्यात यावे. समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास दर ३० दिवसांनी सादर करावा लागणार आहे.

टॅग्स :milkदूधbuldhanaबुलडाणा