शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्षय परतीच्या पावसाकडे; तलाव, धरणे, नदी, नाले कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:35 IST

साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरात गेल्या चार महिन्यात पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नाही. पावसाळा कधी सुरु झाला आणि केव्हा संपला यातच चार महिने निघून गेली. एकदाही दमदार पाऊस न पडल्याने नदी, नाले खळाखळी नाही. त्यामुळे दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परतीच्या पावसाला ५ आॅक्टोंबर पासून सुरुवात झाली. आतातरी दमदार पाऊस ...

साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरात गेल्या चार महिन्यात पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नाही. पावसाळा कधी सुरु झाला आणि केव्हा संपला यातच चार महिने निघून गेली. एकदाही दमदार पाऊस न पडल्याने नदी, नाले खळाखळी नाही. त्यामुळे दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परतीच्या पावसाला ५ आॅक्टोंबर पासून सुरुवात झाली. आतातरी दमदार पाऊस पडू दे आणि एकदाची कोरडी पडलेली नदी, नाले, तलाव धरणे यांची पात्र भरु दे अशी प्रार्थना सर्व सामान्य नागरीक करीत आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाला कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत गेला. जमिनीची तहान भागत नाही तोच पाऊस गुल झाला. तब्बल ४५ दिवस पाऊस पडलाच नाही. श्रावण महिन्यात ‘श्रावण मासी हर्ष मनासी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात पाऊस येवूनही क्षणात ऊन पडे’ ही कविता आठवल्या शिवाय राहात नाही. यावर्षी श्रावण महिन्यात एकदाही सरी पडल्या नाहीत. उलट हिरवळी ऐवजी चोहीकडे गवत वाळली होती. ओढे कोरडी पडली. असेच काहीसे चित्र होते. गणपती उत्सवात पाऊस येईल अशी भोळी आशा लावून बसलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशाच आली. काहीशा सरी मधून मधून पडत गेल्या  पिकाला जिवदान मिळाले पण ते नुकसान व्हायचे ते झालेच त्याला कोणीही थांबवू शकत नव्हते. पावसाळा संपला परतीचे दिवस सुरु झाले. या परतीच्या दिवसात एकदातरी दमदार पाऊस पडून नदी, नाले, तलाव, धरणे तुडूंब भरावी ही अपेक्षा आहे. साखरखेर्डा परिसरात महालक्ष्मी, गायखेडी, जागदरी तलावासह अनेक छोटे, मोठे तलाव अनेक आहेत. त्यापैकी महालक्ष्मी आणि गायखेडी तलावात मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असून दिवाळी नंतर या तलावात पाणी साठा राहिलच याची खात्री नाही. महालक्ष्मी तलावातून साखरखेर्डा गावाला पाणी पुरवठा केला जातो. आज तलावच कोरडा पडला तर दोन वर्षापूर्वीची परिस्थिती निर्माण होवू शकते. गायखेडी तलावामुळे राताळी गावाचा पाणी पुरवठा प्रभावीत होवू शकतो. जागदरी धरणावरुन शेंदुर्जन, राजेगाव, जागदरी, लिंगा, बाळसमुद्र या पाच गावात पाणी पुरवठा होता. गावासाठी पाणी राखीव ठेवले तरच या पाच गावाची तहाणी जागदरी तलाव भागवू शकतो. जर खरीप हंगामात शेतीला पाणी सुरु केले तर ही गावेही पाणी टंचाईच्या कंचाट्यात येवू शकतात. डिसेंबर पासून साखरखेर्डा, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, दरेगांव, बाळसमुद्र, गोरेगाव, उमनगाव, सावंगी, भगत या गावात पाण्याची भिषण टंचाई जाणवू शकते अशी विदारक परिस्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)