खामगाव (बुलडाणा): विधानसभा निवडणुकीसाठी काल १५ रोजी मतदान झाल्यानंतर आता १९ रोजी होणार्या मतमोजणीसाठी तयारी सुरु झाली. यावेळी प्रत्येक मतदार संघाचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंंतच लागणार असल्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून व्यक्त होत आहे.खामगाव मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी स्थानिक जलंब रस्त्यावरील गो.से. महाविद्यालयात होणार आहे. याठिकाणीच स्ट्राँग रुम तयार करण्यात आली असून ही स्ट्रॉग रुम सीलबंद करण्यात येवून मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत. तर यासाठी पोलिस बंदोबस्त सुध्दा लावण्यात आला आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल राहणार असून केंद्र क्रमांक १ ते १४ या अनुक्रमांकाप्रमाणे एकूण २१ फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. म तमोजणीला सकाळी ८ वाजतापासून सुरुवात होणार असून दुपारी १२ वाजेपर्यंंत निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठीची तयारी सुरु असून आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात म तमोजणी अधिकारी,कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. शक्य तेवढा लवकर निकाल देण्यासाठी प्रयत्न केल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी सांगितले.
आता तयारी मतमोजणीची
By admin | Updated: October 16, 2014 23:27 IST