बुलडाणा : जिल्हा कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणयात आले असून संपूर्ण कारागृह आता सीसीटीव्ही कॅमेर्याच्या कक्षेत आले आहे. सोमवारी या कॅमेर्यांची चाचणी घेण्यात येणार असून लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपूर येथील कारागृहातून कैद्यांनी पलायन केल्याच्या पृष्ठभूमिवर राज्यातील विविध कारागृहातील यंत्रणा सजग झाली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा कारागृहात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेर्यांची सोमवारी प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्हा कारागृहातील विविध कामांसाठी जिल्हाधिकारी यांनी ६७ लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी या कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी जिल्हाधिकारी यांनी ७ लाख ६१ हजार रूपये निधी मंजूर केला होता. या निधीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हा कारागृहातील विविध ठिकाणी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सोमवारी या सीसीटीव्ही कॅमेर्यांची प्रत्यक्ष चाचणी होणार असून लवकरच येत्या दोन, तीन दिवसात त्याचे रितसर उदघाटन होणार असल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक गोसावी यांनी दिली.
आता बुलडाणा जिल्हा कारागृह सीसीकॅमेर्याच्या कक्षेत
By admin | Updated: April 6, 2015 02:02 IST