शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

आता राहणार ‘तिस-या डोळय़ा’ची नजर!

By admin | Updated: September 20, 2015 23:21 IST

चिखलीत लोकसहभागातून लागणार सी.सी.कॅमेरे; पतसंस्था, गणेश मंडळे सरसावले.

सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा): 'सावधान तुम्ही सी.सी. कॅमेर्‍यांच्या टप्प्यात आहात' असा इशारा वजा सूचकफलक येत्या काही दिवसांत शहरात वाचावयास मिळाल्यास आश्‍चर्यचकित होऊ नका. कारण, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरातील विविध पतसंस्था, गणेश मंडळे व प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकाराने लवकरच शहरावर '२४७७' तिसर्‍या डोळ्यांची नजर राहणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात लोकसहभागातून सुमारे ७0 सी.सी. कॅमेरे कार्यान्वित होणार असून, त्यानुषंगाने २0 सप्टेंबर रोजी शहरात यशस्वी चाचणी करण्यात आली.चिखली शहर तसे शांतताप्रिय; परंतु अलीकडे एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. या पार्श्‍वभूमीवर शहरात सी.सी. कॅमेर्‍यांची गरज ओळखून ठाणेदार विजयसिंह राजपूत व मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील विविध पतसंस्था, गणेश मंडळांनी तत्परता दर्शवून लोकसहभाग नोंदविण्यासाठी पुढे आल्याने पहिल्या टप्प्यात १00 पेक्षा अधिक सी.सी. कॅमेरे लावण्याचे नियोजन ठाणेदार राजपूत व मुख्याधिकारी चव्हाण यांनी केले आहे.चिखली शहरातील विविध घटनांची दखल घेत चौकात व वर्दळीच्या ठिकाणी सी.सी. कॅमेरे लावण्याची संकल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी गतवर्षी मांडली होती. त्यानुसार स्थानिक व्यापारी असोसिएशनसोबत ठाणेदार राजपूत यांची बैठकदेखील झाली होती; परंतु पुढे याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही; मात्र त्यापश्‍चात गत महिनाभरात सराफा दुकानांसह पानमसाला विक्रीचे दुकान तसेच इतर घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा शहराला सी.सी. कॅमेर्‍यांची गरज असल्याचे अधोरेखित झाल्याने जिल्हय़ात सर्वप्रथम लोकसहभागातून चिखली शहरात सी.सी. कॅमेरे बसविण्यात येणार आहे, हे विशेष. दरम्यान, त्यानुषंगाने ठाणेदार राजपूत व मुख्याधिकारी चव्हाण यांनी सहकारी कर्मचारी तसेच या महत्त्वपूर्ण कामात योगदान देणार्‍या पतसंस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पत्रकारांसमवेत शहरात २0 सप्टेंबर रोजी सी.सी. कॅमेर्‍यांच्या कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक परिसर, शाळा-महाविद्यालयीन परिसर, आठवडी बाजार व इतर गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी उच्चप्रतीचे सुमारे १00 सी.सी. कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे तसेच यासाठी चिखली पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येऊन शहरातील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.