शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीवर आता अधिकाऱ्यांची नजर!

By admin | Updated: May 15, 2017 00:31 IST

नाफेड केंद्रावर गैरप्रकार : पंचनामा झालेल्या तुरीचा १५ मेपर्यंत मोजणी करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात नाफेड केंद्रावर कृउबास संचालकांचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे ‘कृउबास संचालकांकडे तूर विक्रीची सेटिंग’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १३ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नाफेड केंद्रावर तूर खरेदीमध्ये गैरप्रकार होऊ नये, म्हणून बुलडाणा येथील तहसीलदारांनी पंचनामा झालेल्या तुरीची १५ मेपर्यंत मोजणी करण्याचा आदेश देऊन नाफेड केंद्रावर नजर ठेवण्यासाठी पुरवठा निरीक्षक व तालाठ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर तूर खरेदीमध्ये गैरप्रकार वाढले असून, अनेक केंद्रांवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचाही हस्तक्षेप वाढला आहे. यामुळे नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी दोन महिन्यांपासून नंबर लावून बसलेल्या शेतकऱ्यांची तूर अद्यापही विकल्या गेली नाही; मात्र कृउबास संचालकांच्या नातेवाईक शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची तूर लगेच विक्री होते. नाफेड केंद्रावर चालू असलेले गौडबंगाल ‘लोकमत’ने ‘कृउबास संचालकांकडे तूर विक्रीची सेटिंग’ या मथळ्याखाली १३ मे रोजी वृत्त प्रकाशित करून समोर आणला. यामुळे नाफेड प्रशासनासह महसूलच्या अधिकाऱ्यांनाही जाग आली. त्यानंतर दोन महिन्यांपासून तूर विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाही नाफेड केंद्रावर सुरू असलेला गैरप्रकार समजला असता, बुलडाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ झाला होता. तेव्हा तहसीलदार सुरेश बगळे यांनी येथील केंद्रावर जाऊन पाहणी केली असता, अनेक शेतकऱ्यांची पंचनामा झालेली तूर खरेदी करणेच अद्याप बाकी असल्याचे दिसून आले. तूर खरेदी करण्यासाठी बारदाना उपलब्ध करून व शासनाने मुदत वाढवून दिलेली असतानाही पंचनामा झालेली तूर खरेदी करण्यास विलंब होत असल्याने नाफेड केंद्रावर तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या रांगा वाढतच आहेत. तेव्हा नाफेड केंद्रावर तूर खरेदीमध्ये गैरप्रकार होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी बुलडाणा येथील तहसीलदार सुरेश बगळे यांनी पंचनामा झालेल्या तुरीची १५ मेपर्यंत मोजणी करण्याचा आदेश दिला. तसेच नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची रीतसर तूर खरेदी व्हावी व गैरप्रकार करणाऱ्यांवर करडीनजर ठेवण्यासाठी पुरवठा निरीक्षक इंगळे, तलाठी शिवानंद वाघ यांची नियुक्ती केली आहे. तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघनतहसीलदार सुरेश बगळे यांनी बुलडाणा येथील नाफेड केंद्रावर तुरीचा पंचनामा करून सदर तूर खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंचनामा झालेली तूर खरेदी लवकर व्हावी, यासाठी तीन काटे लावण्याचे आदेश दिले होते. परंतु तूर खरेदी करण्यासाठी तिसरा काटाही येथे सुरू करण्यात आला नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी अपूर्ण आहे. बुलडाणा येथील नाफेड केंद्रावर शनिवारपर्यंत तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. पंचनामा झालेल्याच तुरीला काट्याची प्रतीक्षाजल्ह्यात आतापर्यंत २८९ कोटी ३६ लाख रुपये किमतीची ५ लाख ७३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही १ लाख २ हजार तुरीच्या पोत्याची खरेदी बाकी आहे. सध्या पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी सुरू असताना बुलडाणा येथील तहसीलदारांनी पंचनामा केलेल्या तुरीची मोजणीच झालेली नव्हती. पंचनामा केल्यानंतर शनिवारला बुलडाणा बाजार समितीच्या यार्डवर ८ हजार ७५० क्विंटल तूर खरेदी करणे बाकीच होते. पंचनामा झालेली तूर खरेदी सोमवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नाफेड केंद्रावर कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. - सुरेश बगळे, तहसीलदार, बुलडाणा