शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकार्‍यांना नोटीस

By admin | Updated: July 10, 2014 23:19 IST

रजेवरील न.प.कर्मचार्‍यांना मागितला खुलासा

खामगाव: कार्यालयीन वेळेत गैरहजर कर्मचार्‍यांना तसेच दौर्‍यावर असलेल्या अधिकार्‍यांना आज गुरूवारी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी, कर्मचारी कार्यालयात गैरहजर असल्याचे सचित्र वृत्त (स्टिंग ऑपरेशन) लोकमतने गुरूवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते, हे येथे उल्लेखनिय!नगराध्यक्ष, उपाध्यक्षांच्या जागी प्रशासकांनी पदभार घेतल्यानंतर नगर पालिकेचा कारभार चांगलाच ढेपाळल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशीत होताच, नगर प्रशासन विभाग खळबळून जागे झाले. मुख्याधिकारी डी.ई. नामवाड यांनी आज सर्व विभाग प्रमुखांना कुठे दौर्‍यावर असल्याबाबत तसेच कार्यालयातील रजेवर असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांबाबत लेखी खुलासा मागीतला आहे. बुधवारी नगर पालिका कार्यालयातील विविध विभागाच्या प्रमुखांसह अनेक विभागातील कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले होते. शिक्षण आणि कर विभाग वगळता अन्य विभाग सामसूम होते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत बुधवारी नगर पालिकेतील कारभार चांगलाच ढेपाळल्याचे चित्र होते. तथापि, आता प्रशासनाने दांडी बहाद्दर कर्मचार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.