शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निवेदन देणा-यालाच कारवाईची नोटीस

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

शेगाव येथील कोतवाल भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप.

फहीम देशमुख / शेगाव ( जि. बुलडाणा): मागील महिन्यात शेगाव शहर व तालुक्यातील रिक्त असलेल्या कोतवाल पदाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करून चौकशी करण्याची मागणी करणार्‍या निवेदनकर्त्यालाच निवड समितीचे सचिव तथा तहसीलदार गणेश पवार यांनी निवेदन का दिले तुमच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा घातल्याबाबत कारवाई का करण्यात येवू नये, अशी नोटीस बजावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.शेगाव शहर व तालुक्यात काही गावांकरिता मागील आठवड्यात कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पार पडली. यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप परीक्षार्थ्यांसह शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिनेश शिंदे यांनी निवड समितीचे सचिव तथा तहसीलदार गणेश पवार यांच्याकडे केला. निवड प्रक्रिया सुरू असताना व कार्यालयाने अनेक चुका निकालामध्ये केल्या आहेत. एकाच व्यक्तीला दोन वेळा पात्रसुद्धा दर्शविले आहे. यामुळे या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय या आरोपाकडे दुर्लक्ष करीत कुठलीही चौकशी न करता निवड समितीने कोतवाल भरती घाईघाईने पूर्ण केली. यामुळे शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, तहसीलदार पवार यांनी निवेदनकर्ते शिंदे यांना नोटीस बजावून आपण निवेदनात आरोप करून सरकारी कामात अडथळा आणल्याने आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये, अशी नोटीस बजावली. प्रकरणामध्ये अनियमितता झाल्याने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. नोटीस निवड समिती अध्यक्षांनी दिली असून, तो प्रक्रियेचा भाग आहे, असे याबाबत तहसीलदार गणेश पवार यांनी सांगितले.