शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 11:42 IST

Notice of confiscation मालमत्ता कर न भरणाऱ्या २९० मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांवर कारवाईची मोहीम उघडल्यानंतर नगर पालिका प्रशासनाने आता मालमत्ता कर न भरणाऱ्या २९० मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत. पालिकेने १०५ बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, कारवाईचे पुढचे पाऊल म्हणून मोठ्या आणि कर वसुलीत सहकार्य न करणाऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत पालिका प्रशासन आणि थकबाकीदारांमध्ये ‘संघर्ष’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुलीचे आदेश नगर विकास विभागाने काढले आहेत. या पार्श्वभूमीवर खामगाव नगर पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली असून, या कारवाईचा एक भाग म्हणून थकबाकीदारांच्या याद्या चौका-चौकात प्रसिद्धीसाठी तयार केल्या आहेत. दरम्यान, या मोठ्या थकबाकीदारांना सूचना वजा नोटीस बजावण्यात आल्या. या सूचनेकडे कानाडोळा करणाऱ्या २९० थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीसाठी सक्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.खामगाव शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर विविध स्वरूपांच्या करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मालमत्ता कराची सर्वात जास्त थकबाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाकडून वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये मालमत्ता जप्ती सोबतच नळ कनेक्शनही कापण्यात येणार आहे. सोबतच इतरही दंडात्मक कारवाई आणि नामुष्कीसाठी तयार रहावे लागणार असल्याचे सूतोवाच पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावTaxकर