शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एकही माेलकरीण पॅकेजसाठी पात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ‘ब्रेक द चैन’अंतर्गंत कडक निर्बंध लादले आहेत. काेराेना संसर्ग वाढल्यामुळे घरगुती काम करणाऱ्या माेलकरणी आर्थिक संकटात सापडल्या आहेत. नाेंदणीकृत माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील एकही माेलकरीण यासाठी पात्र नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. तसेच तालुका व गावपातळीवर काम करणाऱ्या अनेक माेलकरणींनीनी नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे अनेक माेलकरणींना काम मिळणे बंद झाले आहे. अनेकांनी घरात माेलकरणीला कामावर न येण्यास सांगितले आहे. आधीच अठरा विश्व दारिद्र असलेल्या माेलकरणींवर काेराेनाच्या रूपाने आणखी एक संकट आले आहे. या माेलकरणींना मदत देण्याची घाेषणा शासनाने केली असली तरी नाेंदणीकृत असलेल्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे इतर माेलकरणींना मदतीपासून वंचित राहावे लाणार आहे.

सहा हजार माेलकरणींची नाेंदच नाही

जिल्ह्यात जवळपास १० हजार माेलकरणी आहेत. त्यापैकी केवळ ३ हजार ६४३ माेलकरणींनी नाेंदणी केली आहे. दाेन ते तीन वर्षांपासून नूतनीकरण केलेले नाही. शासनाकडून विविध याेजनांच्या माध्यमातून माेलकरणींना लाभ देण्यात येणार आहे. मात्र, अनेक माेलकरणींना माहितीच नसल्याने त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे, सहा हजारांपेक्षा जास्त माेलकरणी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

नूतनीकरण आवश्यक

जिल्हाभरातील ३ हजार ६४३ माेलकरणींनी कामगार कार्यालयात नाेंदणी केली आहे. मात्र, दाेन ते तीन वर्षांपासून नाेंदणीचे नूतनीकरण केलेले नाही. नाेंदणी केल्यानंतर दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र, नाेंदणी केलेल्या एकाही माेलकरणीने नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश माेलकरणींनी तर नाेंदणीच केलेली नाही. त्यामुळे, शासनाने पॅकेज जाहीर केले असले तरी जिल्ह्यातील माेलकरणींना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग वाढल्यानंतर काम मिळणे बंद झाले आहे. आधीच अल्प मजुरी मिळते. त्यातच मिळणारे कामही बंद झाल्याने आर्थिक संकट आले आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट न ठेवता सरकट मदत देण्याची गरज आहे. तरच लाभ मिळेल.

शांताबाई इंगळे

कामगार कार्यालयात नाेंदणी करावी लागते, याविषयी माहितीच नाही. त्यामुळे, नाेंदणी केली नाही. गेल्या वर्षीपासून काम बंद झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा हाेताे. यावर्षी पुन्हा काेराेना संसर्ग वाढल्याने अनेक घरमालकांनी कामावर बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, शासनाने भरीव मदत देण्याची गरज आहे.

सविता वानखडे, बुलडाणा

काेराेनाचा सर्वाधिक फटका माेलकरीणला बसला आहे. काेराेनाच्या भीतीने घरमालकांनी घरकामाला बाेलावणे बंद केले आहे. त्यामुळे, उदर निर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. शासनाने नाेंदणीकृतची अट शिथिल करून सरसकट घरकाम करणाऱ्या सर्वच महिलांना मदत द्यावी.

रजनी जाधव, बुलडाणा