शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिखली बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : येथील बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये माजी आमदार राहुल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : येथील बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय नंदकिशोर सवडतकर यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड झाली आहे. तर प्रशासक मंडळात १८ जणांचा समावेश असून या सर्व अशासकीय व्यक्तींच्या पात्रतेतेची शहानिशा करून नियुक्ती करावी, असे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कार्यसन अधिकारी जयंत भोईर यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिली आहेत.

नवनियुक्त अशासकीय प्रशासक मंडळात सवडतकर हे मुख्य प्रशासक राहणार आहेत, तर प्रशासक म्हणून शिवराज विठ्ठलराव पाटील, संतोष रमेश वानखेडे, गजानन त्र्यंबक परिहार, शे. आरीफ शे. महेबूब, अ‍ॅड. मनमोहन भास्कर घेवंदे, संजय किसनराव खेडेकर, गजानन प्रल्हाद परिहार, परमेश्वर ऊर्फ बाळासाहेब सखाराम पवार, सतीश व्यंकटराव बाहेकर, दीपक संतोषराव म्हस्के, नितीन रंगनाथ इंगळे, श्रीकिसन तेजराव धोंडगे, विलास नारायणसिंग सुरडकर, रामकृष्ण कोंडुबा अंभोरे, रवींद्र उत्तमराव भगत, प्रवीण डिगांबर वराडे, राजेंद्र सुरेशराव पाटील या १८ जणांचा समावेश आहे. त्यांच्या पात्रतेची शहानिशा करून अशासकीय प्रशासक मंडलात त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

वर्षभरात संगीतखुर्चीचा खेळ !

चिखली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २५ जून २०२० रोजी संपुष्टात आल्यानंतर सहायक निबंधक गितेशचंद्र साबळे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, याविरोधात तत्कालीन सभापती ज्ञानेश्वर सुरुशे यांनी पणन विभागाकडे अपील दाखल करून प्रशासक नेमणुकीला स्थगिती मिळविली होती. त्यामुळे समितीच्या संचालक मंडळाकडे पूर्ववत पद्भार सोपविण्यात आला होता. दरम्यान संचालक मंडळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर पुन्हा ३ फेब्रुवारी रोजी बाजार समितीवर प्रशासक म्हणून साबळे यांची नियुक्ती झाली. दरम्यान आता वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतर समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत.