शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिनचा दुसरा डाेस मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

राेजगार मेळावा, समुपदेशन कार्यशाळा बुलडाणा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने २७ ते ३० मे ...

राेजगार मेळावा, समुपदेशन कार्यशाळा

बुलडाणा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने २७ ते ३० मे या दरम्यान वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात नामवंत कंपन्यांच्या विविध पदांकरिता ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविला.

मालवाहू वाहनाची कारला धडक

बुलडाणा : मालवाहू वाहनाने कारला समोरून जोरदार धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना २७ मे रोजी सकाळच्या सुमारास राजूर घाटात घडली. या प्रकरणी मालवाहू चालक सरदारसिंह हनुसिंग राजपूत (रा. मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

राजीव सातव यांना अभिवादन

किनगावराजा : काँग्रेसचे राज्यसभा सदस्य स्व. राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे किनगावराजात आगमन झाले असता काँग्रेसच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच संजीवनी कायंदे, माजी सरपंच वामन झोरे, दत्तात्रय झोरे, उत्तम झोरे, बाबूराव राजे, अविनाश राजे व इतर उपस्थित हाेते़

मार्ग बदलून रेतीची अवैध वाहतूक सुरूच

सिंदखेडराजा : घाट नसलेल्या ठिकाणांहून वाळू उपसा व वाहतूक सातत्याने सुरूच आहे. त्यासाठी फक्त मार्ग बदलण्यात येत आहे़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़

‘त्या’ मारहाणीचा भाजपने केला निषेध

बुलडाणा : जालना येथील भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पाेलिसांनी केलेल्या मारहाणीचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात आला़ तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे बुलडाणा शहराध्यक्ष सोहम झाल्टे यांनी दिला आहे़

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

बुलडाणा : राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ दहावीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी हाेत आहे़ काेराेनामुळे आधीच पालक माेठ्या संकटात सापडले आहेत़

मन तंदुरुस्त हाेण्याची गरज

चिखली : कोरोनाच्या या संकटकाळात हरिनाम, भजन, कीर्तन आणि अध्यात्म मानसिक उपचारांसारखेच ठरतात. मन तंदुरुस्त झाले तर शरीर आपोआप तंदुरुस्त होते. मनाला निरोगी ठेवण्यासाठी हरिनामाची आवड असणे आवश्यक आहे, असे मत पुरुषोत्तम महाराज यांनी व्यक्त केले़

बुलडाणा शहरात स्टॅम्प पेपरचा तुटवडा

बुलडाणा : कोरोना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. पेरणीचे दिवस समोर येऊन ठेपले असताना शेतकरी पीक कर्जासाठी धडपड करीत आहेत. जोपर्यंत शेतकरी स्टॅम्प पेपर बँकेत जमा करीत नाहीत तोपर्यंत बँक पीक कर्ज देत नाही. त्यात काही स्टॅम्प पेपर दुकानदारांनी स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र आहे़

बुद्ध जयंतीनिमित्त केले भाेजनदान

बुलडाणा : शहरातील श्री महालक्ष्मी आराधी मंडळाच्यावतीने बुद्ध जयंतीनिमित्त स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भात व खिरीचे वाटप केले़

कृषी पंपांना रात्रीही वीजपुरवठा द्या

बुलडाणा : मागील काही दिवसांपासून शेती पंपांचा रात्रीचा बंद असलेला सिंगल फेज वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी ‘स्वाभिमानी’च्यावतीने करण्यात आली आहे़

अवैध गावठी दारू विक्री वाढली

देऊळगाव राजा : तालुक्यात काेराेना संक्रमणाच्या काळातही अवैध गावठी दारूची विक्री हाेत असल्याचे चित्र आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच देऊळगाव राजात छापा टाकून दारू जप्त केली हाेती़