शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून वेतन नाही!

By admin | Updated: May 30, 2016 02:12 IST

खामगाव पालिका कर्मचा-यांना महागाई भत्त्याचीही प्रतीक्षा.

खामगाव : नगरपालिकेतील सुमारे ४५0 कर्मचार्‍यांना गेल्या दोन महिन्यांपासून नियमित वेतन मिळाले नाही, सोबतच या कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्त्याचीही रक्कम अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविताना अनेकांच्या नाकीनऊ येत असून, शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने वेतन अदा करण्याची मागणी जोर धरत आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून खामगाव नगरपालिकेचा नावलौकिक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खामगाव नगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळले आहे. खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी. ई. नामवाड यांना एका कथित प्रकरणात निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी. आर. बोरीकर यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी खामगाव नगरपालिकेचा प्रभार सांभाळण्यासाठी असर्मथता दर्शविली. त्यामुळे आता खामगाव पालिकेतील नगराध्यक्ष पदाचा प्रभार चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तथापि, मुख्याधिकारी नामवाड यांच्या निलंबनानंतर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळले. प्रभारी मुख्याधिकारी डी. आर. बोरीकर यांनी खामगाव पालिकेला वेळ न दिल्याने, खामगाव पालिकेतील प्रशासकीय आणि वित्तीय बाबींमध्ये तांत्रिक अडचण झाली. दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी पदभार स्वीकारला असला, तरी प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी त्यांना बराच अवधी द्यावा लागणार आहे. म्हणजेच पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळावर आणण्यासाठी चांगलाच काळ जाऊ द्यावा लागेल. तथापि, या काळात पालिकेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेतील सर्वच कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना आपल्या दैनदिन गरजा भागविताना चांगलीच दमछाक करावी लागत आहे.