शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येनंतरही मदत नाही!

By admin | Updated: April 13, 2016 01:12 IST

बुलडाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत ४४ शेतकरी आत्महत्या; ४0 कुटुंबांना अद्याप न्यायाची प्रतीक्षा.

नीलेश शहाकार/ बुलडाणासततची नापिकी व कर्जामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी अनेक सामाजिक हात पुढे येत असले, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर्षी तीन महिन्यात झालेल्या ४४ शेतकरी आत्महत्यांपैकी ४0 प्रकरणे अद्यापही शासनाच्या उंबरठय़ावर प्रलंबित आहेत, तर केवळ दोन शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीचा लाभ झाला असल्याची बाब पुढे आली आहे. मंगळवारी पुन्हा दोन शेतकर्‍यांनी गळफास जवळ केल्याने हा आकडा वाढताच आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात ४४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. जानेवारी महिन्यात नऊ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यांपैकी केवळ दोन प्रकरणं पात्र ठरवून त्यांना मदत देण्यात आली. दोन प्रकरणं अपात्र ठरवून पाच प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. एप्रिल महिन्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्याची माहिती संकलीत करणे सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्यांबाबत विचार करायला वेळच मिळाला नसल्याचे चित्र दिसले. कारण फेब्रुवारीत १६ आणि मार्चमध्ये १९ शेतकरी आत्महत्या झाल्यानंतरही यापैकी एकही प्रकरण पात्र व अपात्र घोषित न करता, सर्व प्रकरणं चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे ४0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.