शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अग्रिम कर्जासाठी एकही शेतकरी पात्र नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST

रुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्‍यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्‍याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बँक चांडोळ येथील प्रकार बँक खाते एनपीएमध्ये गेल्याने अग्रिम मंजूर करता येणार नसल्याची बँक अधिक-यांची स्पष्टोक्ती

बबन फेपाळे । लोकमत न्यूज नेटवर्करुईखेड मायंबा : शासनाने शेतकर्‍यांना कर्ज माफ केले असून, दहा हजार रुपये अग्रिम देण्याची घोषणा केली आहे. परंतु, यात चांडोळ परिसरातील एकही शेतकरी पात्र नसल्याचा खुलासा महाराष्ट्र बँक शाखा चांडोळने केला. त्यामुळे परिसरातील एकाही शेतकर्‍याला अग्रिम दहा हजार रुपये मिळाले नाहीत.शासनाने अल्पभूधारक सर्व शेतकर्‍यांचे दीड लाखांच्या आत कर्ज माफ केले. तशाप्रकारची घोषणा मंत्र्यांनी केली. तसेच पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांचाही आता कर्जमाफीत समावेश करण्यात आला आहे. २00९ पासून तर २0१६ पर्यंत थकीत असलेले कर्ज शासनाने माफ केले आहे. त्यानुसार परिसरातील सर्व शेतकरी शासनाच्या निकषात बसतात. तसेच शेतकर्‍यांना खरिपाच्या पेरणीसाठी मदत म्हणून अग्रिम १0 हजारांची मदत जाहीर केली. त्यानुसार चांडोळ परिसरातील कुलमखेड, माेंढाळा, सातगाव म्ह., म्हसला बु., म्हसला खु., ईरला, चांडोळ, रुईखेड मां., मोहोज, भडगाव, ढंगारपूर, जांब आदी गावांतील एकूण ३00 शेतकर्‍यांनी रीतसर अर्ज भरून शेतीची महत्त्वाची कामे असताना दिवसभर बँकेत रांगा लावून अर्ज भरून दिले. एका अर्जासाठी कमीत कमी ३00 रुपयांपर्यत खर्च झाला. सध्या शेतात कामे सुरू असून, शेतकर्‍यांना २00 ते ३00 रुपये रोज मिळत आहे. सदर मजुरीला न जाता शेतकरी बँकेत उभे राहिले. त्यानंतर शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली. त्यावर तुमचे बँक खाते एनपीएमध्ये गेल्याने अग्रिम मंजूर करता येणार नसल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे स्वत: जवळ पैसे असते, तर खाते एनपीएमध्ये गेलेच कशाला असते, अशी शेतकर्‍यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांची होत असलेली हेळसांड थांबविण्याची मागणी परिसरातून होत आहे.

२१ महिन्यांपेक्षा जास्त काळ खाते थकल्यामुळे ते एनपीएमध्ये जाते. त्यामुळे अग्रिमसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अग्रिम जमा करता येणार नाही.- चंद्रशेखर पाठराबेव्यवस्थापक, महाराष्ट्र बँक चांडोळ