शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी निर्धार परिषदेचे आयोजन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:55 IST

दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या कर्त्या समाजसुधारकांच्या मार्गदर्शनात १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये सदर परिषद होत आहे. परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषाली बोंद्रे, आ. राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

ठळक मुद्दे हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या कर्त्या समाजसुधारकांच्या मार्गदर्शनात १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये सदर परिषद होत आहे. परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषाली बोंद्रे, आ. राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.येथील पत्रकार भवनमध्ये निर्धार परिषदेच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आ. राहुल बोंद्रे, वृषाली बोंद्रे, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, पंजाब गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी माहिती देताना आ. बोंद्रे म्हणाले की, राष्ट्रमाता माँ जिजाऊंना जन्म देणार्‍या मातृतीर्थ जिल्ह्यात सध्या गावागावामध्ये दारू विक्रीचा उच्चांक निदर्शनास येत आहे. या दारूच्या व्यसनामुळे माता भगिनी त्रस्त आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषद आयोजित केली असल्याचे आ. बोंद्रे यांनी सांगितले. १५ सप्टेंबर रोजी या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन दुपारी १२ वाजता सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते होईल. आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, बुलडाणा नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम यांची उद्घाटन समारंभात उपस्थिती राहणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ‘हिरकणी’च्या संस्थापक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे राहतील. या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आ. राहुल बोंद्रे, नरेंद्र लांजेवार, प्रेमलता सोनुने, गणेश वानखेडे, सुनीता भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योती ढोकणे, पंजाब गायकवाड, मनजितसिंग शीख, ज्योती बियाणी, शोभा सवडतकर यांनी केले आहे.