शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार विद्यार्थ्यांंच्या दप्तराची तपासणी

By admin | Updated: September 1, 2016 02:29 IST

बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे झाले जड.

गणेश मापारी खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३१: विद्यार्थ्यांंच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील ८ हजार ९२६ विद्यार्थ्यांंच्या दप्तराची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ८९९ विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे निकषापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांंच्या वजनाच्या तुलनेत १0 टक्क्यापेक्षा अधिक असू नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या ३0 टक्क्यापेक्षा जास्त आढळून आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांंना पाठदुखीचा त्रास होणे, मणक्याची झीज होणे, थकवा येणे यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयातील याचिकेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांंच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांंंच्या द प्तरांची तपासणी करण्यात येते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंंतच्या विद्यार्थ्यांंंचे सरासरी वजन ठरवून त्यानुसार विद्यार्थ्यांंंच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे अपेक्षि त वजन ठरविण्यात आले आहे. दप्तराचे वजन ठरविलेल्या निकषानुसार आहे किंवा नाही, यासाठी विद्यार्थ्यांंंच्या दप्तराची तपासणी करण्यात येत आहे.यावर्षीही बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील शासकीय व खासगी शाळांमधील ८ हजार ९२६ विद्यार्थ्यांंंच्या दप्तराची तपासणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली. यापैकी ८९९ विद्यार्थ्यांंंच्या दप्तराचे वजन निकषापेक्षा अधिक आढळून आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने संबंधित शाळांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. दप्तराचे अपेक्षित वजनइयत्ता पहिली २0१0 ग्रॅम इयत्ता पाचवी३१९५ ग्रॅमइयत्ता दुसरी२२३५ ग्रॅम इयत्ता सहावी३२९५ ग्रॅमइयत्ता तिसरी २५0५ ग्रॅम इयत्ता सातवी३७८५ ग्रॅमइयत्ता चौथी२८३0 ग्रॅम इयत्ता आठवी४२४५ ग्रॅम