मोताळा : बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत मलकापूर तालुक्यातील निमखेड येथील नवविवाहितेच्या खूनप्रकरणी आरोपीस ८ एप्रिल रोजी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मनाविरुद्ध स्वत:च्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे चिडून जाऊन निमखेड ता. मलकापूर येथील बाळु रामा हिवरे याने ५ एप्रिल रोजी स्वत:च्या नवविवाहित मुलीच्या घरात जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले होते. घटनेत गंभीर जखमी नवविवाहितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शनिवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर या आरोपीस पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता, त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
निमखेडप्रकरणी आरोपीस कोठडी
By admin | Updated: April 8, 2017 23:47 IST