शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अंड्याचा अनिल, तर उण्याचा झाला उमेश : पारधी वाड्यातील नावांना नवीन ‘लूक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 11:18 IST

पूर्वी अंड्या नाव असलेल्याचे अनिल, उण्याचा उमेश अशी नावे, आता ठेवली जात असल्याची माहिती मेहकर तालुक्यातील परतापूर येथील युवकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देशिक्षणाच्या प्रवाहात आल्याने या समाजात आता अनेक बदल झालेले दिसून येत आहेत. पूर्वीपेक्षा आता बरेच नावे बदलल्याची माहिती नागरिकांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोसा: पारधी वाड्यामध्ये वेगळ्या नावांचे महत्व आहे. जे चलनात असते असे नावे यांच्यामध्ये ठेवण्यात येतात. मात्र अलीकडील काळात युवक शिक्षणाकडे वळल्याने त्यांच्या नावातही बदल झाल्याचे दिसून येते. पूर्वी अंड्या नाव असलेल्याचे अनिल, उण्याचा उमेश अशी नावे, आता ठेवली जात असल्याची माहिती मेहकर तालुक्यातील परतापूर येथील युवकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पारधी समाज वसलेला आहे. शिक्षणाच्या प्रवाहात आल्याने या समाजात आता अनेक बदल झालेले दिसून येत आहेत. पूर्वी पारधी वाड्यामध्ये वेगवेळ्या नावांची क्रेझ होती. बुलेट, टायगर, दारासिंग, पिस्तुल्या, बेट, रामफळ, मिठू, कामुळा, बाबुलाल, आंड्या, उण्या, टिंगर, बाब्जा, नाहीजा, बाबुजन, रूपलाल अशी नावे ठेवली जायची. आताही पारधी वाड्यात वेगळ्या नावांची लोकं दिसून येतात. परंतु शिक्षणाचे प्रमाण या वाडयांमध्येही वाढल्याने वेगळी नावे ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे.मेहकर तालुक्यातील परतापूर येथील पारधी वाड्यावर भेट दिली असता, पूर्वीपेक्षा आता बरेच नावे बदलल्याची माहिती नागरिकांनी दिली. सर्वपरिचित असलेली नावेच आता या भागात ठेवली जात आहेत. नुकत्याच लागलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालातही परतापूर येथील पारधी वाड्यातील मुलांनी चांगले यश मिळविल्याचे दिसून आहे.मिथून, गोविंदा या सारख्या चित्रपट कलावंताचा प्रभाव आजही पारधी वाड्यातील नावावरून जाणवतो. शिक्षणाकडे युवक वळले असून, त्यांना चांगले यश येत असल्याची माहिती पदवीधर राजेंद्र बाबुसिंग पवार या युवकाने दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा