शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेशीम’ वाढीसाठी नवा अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:33 IST

रेशीम शेतीला चालना मिळत असून, या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवा अजेंडा रेशीम विभागांतर्गत आखण्यात येत आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना मिळत असून, या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवा अजेंडा रेशीम विभागांतर्गत आखण्यात येत आहे. वर्षभरामध्ये रेशीम कोष निर्मिती ५७ हजार ६२३ किलो गॅ्रम झाली आहे. यातून सुमारे एक कोटी ७३ लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे.रेशीम शेती हा व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय आहे. अत्यंत कमी खर्चात आणि शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून हा व्यवसाय करता येतो. जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयांतर्गत नियोजन करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतांमध्ये रेशीम शेती करावी. रेशीम विकास प्रकल्प राबवावा, अशा सुचना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा रेशीम कार्यालयाकडून अंमलबजावणी सुरू झाली आहे. यावेळी एक हजार एकरवर तूती लागवड करण्याचा संकल्प प्रशासनाचा आहे. त्यानुसार सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले आहेत. ७ ते २१ जानेवारी या कालावधीत रेशीम शेतीची माहिती सर्व शेतकरी वर्गास होण्यासाठी प्रचार व प्रसार रेशीम रथाद्वारे जिल्हाभर करण्यात आला. कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाºया नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४४१ गावांमध्ये रेशीम शेती विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. तुती रोप वाटीका, तुती लागवड, रेशीम किटक संगोपन साहित्य व संगोपन गृह यासाठी मनरेगातंर्गत तीन वर्षामध्ये २ लाख ९५ हजार १५० रूपयांचे अनुदान कुशल व अकुशल स्वरूपात देण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ५७ हजार ६२३ किलो कोष काढण्यात आले आहे. यामध्ये १ कोटी ७३ लाख २० हजार ६७५ रुपये उत्पादन शेतकºयांना झाले आहे. यावरही आता उत्पादन वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. २३ जानेवारीला संबंधीत अधिकाºयांची रोहयोच्या उपजिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीतून सुद्धा उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने सुचना अधिकारी व कर्मचाºयांना देण्यात आल्या.

जिल्ह्यात रेशीम उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. ३० जानेवारीपर्यंत नवीन तुती लागवडीसाठी शेतकºयांना नोंदणी करता येणार आहे.- संजय धामणे, रेशीम विकास अधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती