शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे - संजय गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:39 IST

जलसंवर्धनाची चळवळ गावागावात पोहचणे गरजेचे आहे. कारण काहीही अशक्य नाही हे सिंदखेड (प्रजा) वासियांनी सिध्द केले.

- नवीन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे :  मोताळा तालुक्यातील जनुना हे अवघे ३५६ लोकवस्तीचे गाव. कायम दुष्काळी पट्टा, गाव पाणीदार करण्यासाठी गावातील चार मित्र टेलर, गवंडी, पेंटर व विद्यार्थी दुष्काळाशी एकाकी लढा देत आहे. पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत मागील दीड महिन्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत श्रमदानाचे टार्गेट पुर्ण केले आहे. त्यामध्ये शामराव कळमकर व्यवसायाने गवंडी, शिवाजी मानकर व्यवसायाने टेलर, संजय गायकवाड व्यवसायाने पेंटर व योगेश मानकर या चौघांच्या सांघिक प्रयत्नाबाबत संजय गायकवाड यांच्याशी झालेला संवाद. पाणीप्रश्नी चौघे एकत्र कसे आले?  मागील ५ ते ६ वर्षापासून गावातील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. टँकर भरण्यासाठीसुध्दा परिसरात पाणी नाही. त्यामुळे पाणी समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची गरज चर्चेतून पुढे आली व कामाला लागलो.  प्रेरणा कोठून मिळाली?  पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत मोताळा तालुक्यात मोठे काम श्रमदानातून झाले. सिंदखेड गावाने संघर्ष व श्रमदानाच्या जोरावर राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारली व गाव पाणीदार झाले. त्यांना शक्य आहे तर आपणहीकरू शकतो याची प्रेरणा मिळाली व फाऊंडेशननेही प्रतोत्साहन दिले.अपयशाची भीती वाटत होती का?  काम करित असताना परिणामाची चिंता करायची नाही, हे ठरविले होते. त्यामुळे अपयशाची भीती मनात नाही. गमविण्यासारखे आमचेकडे काहीच नाही.आपल्या या प्रयत्नामुळे गाव पाणीदार होईल का?  गाव एकदम पाणीदार होईल, असे आम्ही म्हणणार नाही; परंतु निश्चित फरक पडेल व ते बघून पुढील वर्षी गावकरी या चळवळीत सहभागी होतील. 

पॅकेजबाबत काय मत आहे. आजपर्यंत किती काम झाले?  गावच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला मिळालेले टार्गेट श्रमदानाचे व मशिनव्दारे दोन्ही आम्ही पुर्ण केले व स्पर्धेची तालुकास्तरीय फेरी गाठली आहे. व्यवसायाने पेंटर, गवंडी, टेलर आणि एक विद्यार्थी असलेल्या या चौघा मित्रांनी प्रारंभी आपला व्यवसाय व शिक्षणासाठी वेळ काढून श्रमदानाचे काम सुरू ठेवले होते. परंतु मागील १५ दिवसांपासून फक्त श्रमदान व इतर नियोजनात वेळ कमी  पडतोय. मात्र आमच्या एकाकी लढ्याची समाजानेही दखल घेण्यास प्रारंभ केला आहे. ‘लोकमत’ लोकांसमोर आमचा संघर्ष आणला. तो अनेकांना माहिती झाला. त्यानंतर अनेकांनी आमची भेट घेऊन सहकार्य करण्याची भूमिका दाखवली. आम्हाला आर्थिक पाटबळही त्यामुळे मिळण्यास प्रारंभ झाल्याचे संजय गायकवाड यांनी संवाद साधताना आवर्जून सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाinterviewमुलाखत