शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

तंटामुक्तीचा कार्यकाळ वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:53 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षाचा  आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकाळ वाढविण्याची  मागणी वारंवार केली जात आहे. यासंदर्भात तत्कालीन गृहमंत्र्यांनी  अनुकूलता दर्शवत हा कालावधी दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले;  परंतु ही घोषणा अद्याप कागदावर न आल्यामुळे हा विषय प्रलंबित  राहिला आहे.

ठळक मुद्देतंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षाचाच घोषणेची अंमलबजावणी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षाचा  आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकाळ वाढविण्याची  मागणी वारंवार केली जात आहे. यासंदर्भात तत्कालीन गृहमंत्र्यांनी  अनुकूलता दर्शवत हा कालावधी दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले;  परंतु ही घोषणा अद्याप कागदावर न आल्यामुळे हा विषय प्रलंबित  राहिला आहे.तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहते. दरवर्षी १५ ते ३0  ऑगस्ट या कालावधीत मोहिमेत भाग घेऊ इच्छिणार्‍या ग्रामपंचाय तींनी ग्रामसभा आयोजित करून या मोहिमेत सहभाग घेण्याचा निर्णय  घेणे आवश्यक आहे. यासंदर्भातील पत्र व तंटामुक्त गाव समिती  सदस्यांची यादी संबंधित पोलीस ठाण्यास पाठविली जाते. समिती  सदस्यांसाठी शासनाने आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. समितीच्या  सदस्यांनी निरपेक्ष व नि:पक्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे.  मोहिमेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गावाला तंटामुक्त गाव समिती स्था पन करणे अनिवार्य असते. या कालावधीत सामोपचाराने तंटे मिटविणे  वा नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्यासदेखील पुरेसा वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन त त्कालीन गृहमंत्री स्व.आर. आर. पाटील यांनी मोहिमेचा कालावधी  दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुषंगाने समितीला काम  करण्यास पुरेसा वेळ मिळणार होता; मात्र अद्याप यासंदर्भात कागदो पत्री कुठलीच हालचाल झालेली नाही. सदस्यांनी समितीच्या  बैठकांना उपस्थित राहणे, समितीच्या कामासाठी वेळ देणे व तंटे  मिटविण्याच्या कामात रस घेणे आवश्यक आहे. तंटे मिटविताना  सकारात्मक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत नकारात्मक  अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असल्यास मोहिमेचा मूळ उद्देश साध्य  होणार नाही. जे सदस्य समितीच्या कामकाजात रस घेत नसतील,  समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करत असतील, अशा  सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याचा निर्णय प्रत्येक वर्षाच्या  पहिल्या ग्रामसभेत ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येतो; परंतु  नियमानुसार कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे एक तृ तीयांशहून अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येत नाही. तसेच  समितीचा अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत  असल्यास अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेत  करावी लागते. हे सोपस्कार पार पाडल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रमुख  तंटामुक्त गाव समितीच्या जाहीर यादीची प्रत ग्रामपंचायतीस पाठविता त.  गावांमध्ये शक्यतोवर तंटे निर्माण होऊ नयेत, सामाजिक व  राजकीय सामंजस्य आणि अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करण्यासाठीच्या व  इतर सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांची रूपरेषा ठरविणे, त्याबाबत  जनजागृती करणे व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समितीवर  असते.

तत्कालीन गृहमंत्र्यांनी केले होते सूतोवाचतंटे मिटविताना तंटामुक्त गाव समिती ही मध्यस्थ व प्रेरकाची भूमिका  निभावते. या सर्व कामांसाठी समितीला एक वर्षाचा कालावधी मिळ तो. कारण वर्षभरात प्रत्येक गावाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जा ते. मोहिमेचा हा कालावधी अतिशय कमी असल्याचे निष्पन्न  झाल्यावर २0१३ साली तत्कालीन गृहमंत्र्यांनी तो दोन वर्षांचा  करण्याचे सूतोवाच केले होते; परंतु हा निर्णय अद्याप प्रत्यक्षात  आलेला नाही.आता नवीन सरकार असून, ही योजना लोकाभिमुख असल्याने  समि तीचा कार्यकाळ दोन वर्षांचा करावा, अशी मागणी होत आहे.