शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

बुलडाणा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा

By admin | Updated: June 26, 2014 02:05 IST

एकमताने ठराव मंजूर: पदाधिकार्‍यांनी केली मागणी

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा, अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये झालेल्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत केली.बुलडाणा व मोताळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये सेवानवृत्त नायब तहसीलदार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणीवर चर्चा करून शेतकरी व शेतमजूर व उपेक्षित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र पाटील यांनी सांगितले की, बुलडाणा विधानसभेमध्ये दोन वेळा काँग्रेसचा पराभव झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बुलडाणा विधानसभा मतदार संघामध्ये अधिक आहे. करिता हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावा, अशा मागणीचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके, तालुका अध्यक्ष नसिमबेग मुनिरबेग, सदाशिव घाटे, अनिल वर्मा, वत्सलाबाई जाधव, निलेश देठे, मो.सज्जाद यांनी आपले विचार मांडले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती लक्ष्मी शेळके व जिल्हा परिषद सदस्य सुलोचना पाटील, रेखा जाधव, पं.स.सदस्य किरण जाधव, अनिता शेळके, नगरसेवक उमेश अग्रवाल, भगवानराव शेळके, सुनिता सावळे, आशा पवार, मंगला वायाळ, मधुकर पाटील, पिंपरकर, कदीरोद्दीन, गंजीधर पाटील आदी उपस्थित होते.