शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी

By सदानंद सिरसाट | Updated: March 29, 2024 19:50 IST

आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

नांदुरा (बुलढाणा) : नांदुरा अर्बन बँकेतून कर्मचारी प्रतीक गजानन शर्मा याने साडेपाच कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम क्रिकेट सट्ट्यावर लावत ती हरल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

दी नांदुरा अर्बन को ऑप. बँकेच्या वतीने राजेन्द्रप्रसाद रामकेवल पांडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये आरोपी २०१८ पासून बँकेत कायमस्वरूपी कर्मचारी आहे. कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून बँकेने जबाबदारीचे कामकाज सोपविले होते. १४ ऑगस्ट २०२३ ते २६ मार्च २०२४ पर्यंत त्याने पदाचा, तसेच गोपनीय माहितीचा दुरुपयोग करणे, तसेच बँकेतील इतर कर्मच्याऱ्यांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बँकेच्या एचडीएफसी बँकेतील खात्यामधून अंदाजे पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची अफरातफर केल्याचेही नमूद केले.

याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ४६७, ४६८, १२० ब, सहकलम आय टी ॲक्ट ६६ ब, क, ड नुसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील करीत आहेत. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित असून त्याला कोणताही धक्का लागलेला नाही. एनपीए शून्य असून बँक नफ्यात आहे. ठेवीदारांनी काळजी करू नये, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष चंपालाल झंवर, उपाध्यक्ष दत्तात्रय सुपे व कार्यकारी संचालक राजेंद्रप्रसाद पांडे यांनी केले.

कर्मचाऱ्याला क्रिकेट सट्ट्याचा नादआरोपी शर्मा याला क्रिकेट सट्टा खेळण्याचा नाद आहे. त्यातच साडेपाच कोटी रुपये हरल्याची नांदुरा शहरात चर्चा आहे. ती रक्कम त्याने सट्टेबाजांच्या खात्यात वर्ग केल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदुरा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा सट्टा सुरू असूनही पोलिस त्यापासून अनभिज्ञ आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँकCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी