शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे तीस हजार क्विंटल तूर पडून!

By admin | Updated: March 9, 2017 01:37 IST

भारतीय खाद्य निगमची अनागोंदी; सव्वीस दिवसांपासून तीस हजार क्विंटल तूर उघड्यावर.

सुहास वाघमारे नांदुरा, दि. ८- पीक पिकविण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या शेतकर्‍याला ते हमी भावाने विकण्यासाठीही महिनाभराचा संघर्ष करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दिसून येत आहे. येथे भारतीय खाद्य निगमची तूर खरेदी बारदाना नसल्याचे कारण सांगून बंद पडल्याने मागील सव्वीस दिवसांपासून तीस हजार िक्वंटल तूर आवारात उघड्यावर पडून आहे. तर रात्रंदिवस शेतकरी त्या तुरीच्या गंजीवरच जेवण व झोपून संरक्षण करीत आहेत. तुरीला हमीभावापेक्षा अत्यल्प भाव बाजारपेठेत मिळत असल्याने भारतीय खाद्य निगमने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तुरीची हमीभावाने खरेदी सुरु केली आहे; मात्र सुरुवा तीला दोन ते तीन दिवसच हमिभावाची खरेदी सुस्थितीत होती; मात्र त्यानंतर शेतकर्‍यांच्या नावावर व्यापार्‍यांचा माल विकला जात असल्याची ओरड झाली व त्यातच बारदाना सं पल्याचे सांगून सदर तूर खरेदी खंडित झाली आहे. त्यामुळे मागील १0 फेब्रुवारीपासून शेतकर्‍यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली तूर पडून आहे. आज रोजी सुमारे सव्वीस दिवसात तीस हजार क्विंटल तुरीचा साठा बाजार समिती आवारात शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला आहे. मागील महिनाभरात जेमतेम पाच ते सात दिवस भारतीय खाद्य निगमचे हे केंद्र सुरळीत सुरु होते व ते फक्त पाचशे ते सातशे क्विंटल माल खरेदी करतात व लगेच बारदाना संपला सांगून बाजार समितीमधून निघून जातात. मागील सव्वीस दिवसांपासून शे तकर्‍यांनी तुरीचा माल बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणल्याने शेतकरी त्या मालाच्या सुरक्षिततेसाठी बाजार समिती परिसरातच असतात. रात्रीच्यावेळी त्यांच्या तुरीच्या मालावर जेवण करताना व झोपलेले शेतकरी हे नित्याचेच चित्र आता बाजार समितीमध्ये आहे. ७ मार्चच्या दुपारी ढगाळ वातावरण व पावसाबाबत हवामानाचा अंदाज काहींनी व्यक्त केल्याने शेतकर्‍यांनी त्यांचा तुरीच्या मालाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी धावाधाव केली... अन सभापतींनी झाकली तूरढगाळ वातावरणामुळे ७ च्या संध्याकाळी बाजार समितीत शेतकरी पावसापासून संरक्षणासाठी तुरीच्या मालाला प्लास्टिकच्या कापडाने झाकत होते. त्याचवेळी सभापती नीळकंठराव भगत त्यांच्या शेतातील तुरीचा माल झाकत होते. यावेळी त्यांची स्वत:ची तूर त्यांनी १0 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी आणली असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच भारतीय खाद्य निगम खरेदीबाबत गंभीर नसल्याने शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासाची जाणीव असल्याचे सांगून याबाबत आमदार चैनसुख संचेती प्रयत्नरत असल्याने बारदाना उपलब्ध होणार आहे.