शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा : महिको कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; हजारो क्विंटल बियाणे जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:28 IST

नांदुरा : संकरित व जी.एम (जेनेरिकली मोडीफाईड) बियाणे क्षेत्रातील देशातील नामांकित कंपनी असलेल्या महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी (महिको) वर १0 ते १२ दिवसांच्या सखोल चौकशीनंतर अखेर २0 डिसेंबरच्या पहाटे ३ वाजता मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हे दाखल झाले.

ठळक मुद्देकापूस बियाणे साठवणूक एम.डी.सह चौघांचा आरोपींमध्ये समावेश 

योगेश फरपट/संदीप गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : संकरित व जी.एम (जेनेरिकली मोडीफाईड) बियाणे क्षेत्रातील देशातील नामांकित कंपनी असलेल्या महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी (महिको) वर १0 ते १२ दिवसांच्या सखोल चौकशीनंतर अखेर २0 डिसेंबरच्या पहाटे ३ वाजता मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हे दाखल झाले. या कारवाईमुळे फसवेगिरी समोर आली आहे.खरीप हंगामात बीटी कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना बोंडअळीने ग्रासले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. बोंडअळीला कारणीभूत  असणार्‍या बाबींचा शोध घेणे सुरु असताना धानोरा फाट्यानजिक असलेल्या महिको कंपनीच्या बियाणे साठवण प्रक्रिया व पॅकींग युनिटवर ८ डिसेंबरला रात्री १0.३0 वाजता अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या पथकाने धाड टाकून  बियाणे ठेवलेले सहा गोडाउन सील केले होते. यानंतर नमुने तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाईचे संकेत असतानाच अचानक परत १३ व १४ डिसेंबर रोजी राज्य शासनाच्या कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने महिको कंपनीत पुन्हा आपला मुक्काम हलविला. तीन दिवस संपूर्ण कंपनीमधील भाजीपाला, गहू, हरभरा, धान व इतरही सर्व बियाण्यांची तपासणी केली व पिकांच्या वाण, प्रकारानुसार उपलब्ध बियाणे साठय़ाच्या नोंदी घेतल्या. यानंतर कंपनीतील सर्वच बियाण्यांच्या गोडाउनला सील करण्यात आले.  मलकापूर-नांदुरा, खामगाव, जळगाव, बुलडाणा येथील कृषी विभागाचे विविध अधिकारी मलकापूर व महिको कंपनीत तळ ठोकून होते. या कालावधीत गुन्हे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. शेवटी २0 डिसेंबरच्या पहाटे मोहीम अधिकारी अनंत चोपडे यांच्या तक्रारीवरुन महिकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह विकास पंढरी खुजे, श्रीपाद् लक्ष्मण पाटील, शैलेंद्र हरीश बागराव या चौघांवर कलम ४२0,४६८,४७१ नुसार तसेच बियाणे नियम १९६८ चा नियम १३ नुसार परवानगी नसताना बियाणे साठवणूक व विक्री करणे, नियम ३८ नुसार साठा रजिष्टर व इतर दस्तऐवज सादर न करणे, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ खंड ३ नुसार परवाना नसताना बियाणे साठवणूक करणे, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ खंड १८ (२) नुसार मासिक अहवाल फार्म १८ (२) नुसार मासिक अहवाल फार्म ‘बी’ मध्ये परवाना अधिकार्‍यांना सादर न करणे, महाराष्ट्र कापूस बी-बियाणे पुरवठा, वितरण विक्री व विक्री किंमत निश्‍चिती अधिनियम कलम ११ तसेच नियम ४ व ५ नुसार विक्रीचा परवाना न घेणे तसेच इतर बाबीचे उल्लंघन करणे, जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ३ व ७, बियाणे कायदा १९६६ कलम १५, पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीष बोबडे यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बियाणे उत्पादक कंपनीत बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकार्‍याची नेमणूक असते मग एवढा गंभीर प्रकार होईपर्यंत कोणाच्याच लक्षात कसे आले नाही. 

बियाणे साठा जप्तमहिको कंपनीत नियमबाह्यरीत्या ठेवण्यात आलेला साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये बी.टी.कपाशी बियाणे ५९,६९७ क्विंटल, भेंडी, टोमॅटो,वांगे व इतर भाजिपाला बियाणे साठा ९,७६७ क्विंटल, हरभरा बियाणे ४३६ क्विंटल, धान ६५७0 क्विंटल, गहू ५६१९ क्विंटल असा एकूण ८२ हजार 0८६ क्विंटल बियाणे साठा जप्त करण्यात आला आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा