शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नांदुरा व मलकापूर कृउबास संचालक मंडळास मुदतवाढ

By admin | Updated: June 15, 2014 00:46 IST

मलकापूर कृउबासच्या संचालक मंडळाला राज्याचे पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ जून रोजी एका आदेशान्वये ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

मलकापूर : मलकापूर कृउबासच्या संचालक मंडळाला राज्याचे पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १३ जून रोजी एका आदेशान्वये ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

या मुदत वाढीमुळे प्रशासक ए. बी. सांगळे यांनी आपला पदभार सभापती संजय काजळे पाटील यांच्याकडे सोपविला. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ ८ एप्रिल १३ रोजी संपुष्टात आला होता. शासनाने अधिसूचना ८ फेब्रुवारी १३ रोजी राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका ६ महिने म्हणजेच ७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यास परवानगी दिली होती. शासन अधिसूचना ११ ऑक्टोबर १३ न्वये १0 एप्रिल १४ पर्यंत व आता १0 एप्रिलचे अधिसूचनेद्वारे ११ एप्रिलपासून पुढे ६ महिन्यांकरिता म्हणजेच १0 ऑक्टोबर पर्यंत बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्या आदेशान्वये १४ ऑगस्ट १३ रोजी मलकापूर बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याविरुध्द कृउबासने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने विदर्भातील २६ बाजार समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने २ मे २0१४ रोजी मलकापूर बाजार समितीचा कार्यभार सहाय्यक निबंधक मलकापूर यांनी प्रशासक म्हणून स्विकारला होता. त्यामुळे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. याविरुध्द कृउबासचे सभापती यांनी महाराष्ट्र कृषी पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ४३ अंतर्गत शासनासमोर पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. या अर्जावर राज्याचे पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १२ जून रोजी एका आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला अंतरीम स्थगिती दिली. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पणनमंत्री यांच्या आदेश क्र.७८७९ अन्वये सभापती संजय काजळे पाटील यांना पदभार सुपूर्द केला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोपानराव साठे यांनी याबाबत महत्वाची भूमिका बजावली. बाजार समितीच्या सभागृहामध्ये सभापती काजळे यांना प्रशासक ए. बी. सागळे यांनी आपला पदभार सुपूर्द केला. याप्रसंगी बाजार समिती संचालक शांताराम पाटील, भगवान पाटील, आनंदा शिरसाट, घनश्यामदास चांडक, शे.सलीम शे. मुनीर, विलास पाटील, डॉ.प्रकाश सपकाळ, सतिष अग्रवाल, ए. के. पाटील यांचेसह बाजार समितीचे सचिव राधेश्याम शर्मा, अढाव व सुतगिरणीचे उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, अरुणसिंह राजपूत, दाताळा सरपंच हरिभाऊ देशमुख, रामेश्‍वर पवार, गुणवंत काटकर, खामखेड सरपंच रावजी पाटील, सुभाष पाटील, कचरु पाटील यांयेसह इतरांची यावेळी उपस्थिती होती.