बुलडाणा : नगर पालिकेचे कर बुडविणाऱ्या व वारंवार मागणी करूनही कर नभरणाऱ्या नागरिकांची नावे चौका चौकात झळकविण्यात आली आहे.कर भरण्याचे आवाहन नागरिकांच्यावतीने करण्यात आले होते. मात्र नगरपालिकेच्या आवाहनाला करबुडव्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नगरपालिकेच्यावतीने कर बुडविणाऱ्यांची यादी चौकात झळकविणार असल्याचे आवाहनहीकरण्यात आले होते. मात्र. त्यानंतरही न जुमानणाऱ्या नागरिकांची नावे अखेरचौकात फलकावर झळकविण्यात आली. शहरातील जयस्तंभ चौक, संगम चौक,जिल्हाधिकारी चौक, कारंजा चौक, तहसिल चौक, चिंचोले चौकात करबुडव्यांच्यानावांचे फलक झळकविण्यात आले. शहरातील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी करधारकांनी आपल्याकडे असलेल्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणासत्वर नगर परिषदेकडे करावा, अन्यथा थकीत कर धारकांचे नळ कनेक्शन खंडीतकरणे, मालमत्ता जप्तीची कार्यवाही करणे, मालमत्ता हर्रास करणे इत्यादीअप्रीय कार्यवाही करण्यात येईल, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमारचव्हाण यांनी कळविले आहे
बुलडाण्यात करबुडव्यांची नावे झळकली चौका चौकात
By admin | Updated: March 20, 2017 13:26 IST