शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार ८१९ मतदारांची नावे यादीतून वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

स्थानिक तहसील कार्यालय अंतर्गत १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर छायाचित्र मतदार याद्याचा संक्षिप्त कार्यक्रम ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात ...

स्थानिक तहसील कार्यालय अंतर्गत १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर छायाचित्र मतदार याद्याचा संक्षिप्त कार्यक्रम ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. यासंदर्भात तालुक्‍यातील जवळपास सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे ५ हजार १६० छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या याद्या देण्यात आलेल्या आहेत. त्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याबाबत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सूचीत करून संबंधित तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी संबंधित मतदारांना नोटीस देऊन त्यांचे रंगीत छायाचित्र तत्काळ त्यांच्याकडे जमा करण्याबाबत कळविले आहे. परंतु, तालुक्यातील पाच हजार १६० छायाचित्र नसलेल्या मतदारांपैकी ३४१ मतदारांचे छायाचित्र संबंधित मतदान

केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. उर्वरित ४ हजार ८१९ मतदार स्थलांतरित, मयत, दुबार असल्याकारणाने संबंधित यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत संबंधित मतदाराला यादीभागातून वगळणी करण्याबाबतचा पंचनामा करण्यात आला आहे. तालुक्‍यातील ४ हजार ८१९ मतदार मतदार यादीतून वगळणी करण्याबाबत निवडणूक आयोगास परवानगी मागण्याबाबतची कार्यवाही तहसील स्तरावरून सुरू आहे.

तालुक्‍यातील छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करावयाचे नसल्यास सात दिवसांच्या आत त्यांच्या यादीभागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क करून किवा हरकत घेऊन मतदार यादीत नाव ठेवण्याबाबत पूर्वकल्पना द्यावी. विहीत वेळेत संबंधित मतदारांकडून हरकत प्राप्त न झाल्यास त्यांचे नाव संबंधित मतदार यादीतून कमी करण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे. याबाबत सात दिवसांनंतर संबंधित मतदाराकडून छायाचित्र प्राप्त न झाल्यास नाव कमी होणार आहे.

समाधान सोनवणे, तहसीलदार मोताळा.