बिबी : परिसरात गत काही दिवसांपासून काेराना रुग्णांची संख्या वाढत आहे़ ग्रामीण भागात काॅन्टॅक्ट ट्रेसिंग हाेत नसल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे़
कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा जिल्ह्यापासून ते गावापर्यंत तपासणी मोहीम राबवित आहे.शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी कोरोनारुग्ण वाढल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर आजही पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे ग्रामीण भागात वेगाने पसरणारा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही गावांमध्ये अनेक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब तपासणीमधून पुढे आली आहे. दुकानदारांच्या आरटीपीसीआर टेस्ट करताना अनेकांनी चाचणीला दांडी मारली होती.