शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत नागपूरचा दबदबा; १९ वर्षानंतर झाली बुलढाण्यात स्पर्धा

By निलेश जोशी | Updated: December 17, 2023 22:37 IST

२० वर्षाखालील मुलांच्या ८ आणि मुलींच्या ६ किमीच्या धावण्याच्या शर्यतीत सांगलीचा दर्शत घुमरे आणि रत्नागिरीची साक्षी यादव यांनी बाजी मारली

नीलेश जोशी, बुलढाणा : येथे झालेलेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत महिला व पुरुषांच्या दहा किमी धावण्याच्या स्पर्धेत नागपूरने वर्चस्व गाजवले. सादाब पठाण आणि रिया तोठारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. २० वर्षाखालील मुलांच्या ८ आणि मुलींच्या ६ किमीच्या धावण्याच्या शर्यतीत सांगलीचा दर्शत घुमरे आणि रत्नागिरीची साक्षी यादव यांनी बाजी मारली.

महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, बुलढाणा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन आणि जयमातृभूमी क्रीडा मंडळाच्यावतीने या स्पर्धेचे १७ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड, आ. धिरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव सतिश उचिल, उपाध्यक्ष राजू प्याटी, संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुजा सावळे, बुलढाणा पालिकेचे माजी उपाध्यक्ष विजय जायभाये, बुलढाणा संघटनेचे सचिव गोपालसिंग राजपूत, प्रशिक्षक विजय वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलातंना आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहराचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आहे खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा येथे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत असून तालुकास्तरावर त्यादृष्टीने क्रीडा संकूल उभारण्यास प्राधान्य आहे. त्याद्वारे शहरी तथा ग्रामीण भागातील खेळाडूंना सुसज्ज मैदान व सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

गटनिहाय विजयी खेळाडू

  • पुरुषांच्या १० किमी धावण्याच्या शर्यतीत नागपूरचा सादाब पठाण पहिला आला. उत्तम पाटील (कोल्हापूर) द्वितीय तर सैरव तिवारी (नागपूर) तृतिय स्थानी आला.
  • महिलांच्या दहा किमी धावण्याच्या शर्यतीत नागपूरचीच रिया तोठारे प्रथम, तेजस्वीन लमकाणे (नागपूर) द्वितीय तर प्रणाली शेगोकार (बुलढाणा) ही तृतीय आली.
  • २० वर्षाखालील मुलांच्या ८ किमी धावण्याच्या शर्यतीत सांगलीचा दर्शत घुमरे प्रथम आला. कुमार मादणे (सोलापूर) आणि युवराज वस्के (कोल्हापूर) हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. याच वयोगटात ६ किमी धावण्याच्या शर्यतीत मुलींमध्ये साक्षी यादाल (रत्नागिरी) ही प्रथम तर मिताली भोयार (नागपूर) ही द्वितीय तर सानिका रुपनार (सांगली) ही तृतीय आली.
  • मुलांच्या १८ वर्षा आतील गटात नाशिकचा रोहीत बिन्नर प्रथम आला तर मुलींच्या गटात ४ किमी धावण्याच्या शर्यतीत अहमदनगरची साक्षी भंडारी प्रथम आली.
  • १६ वर्षाखालील मुलांच्या गटात २ किमी धावण्याच्या शर्यतीत कार्तिक चव्हाण (अकोला) आणि मुलींमध्ये जान्हवी हिरदुरकर (नागपूर) हे दोघे प्रथम आले.
टॅग्स :buldhanaबुलडाणा