लोणार (बुलडाणा): घरगुती वादामुळे तीन दिवसांपासून घरातून निघून गेलेल्या माय- लेकीचे प्रेत देऊळगाव वायसा शिवारातील विहिरीत १६ ऑक्टोबर रोजी आढळून आले. रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथील कल्पना पवार (२२) हिचे काही दिवसांपूर्वी घरच्यांसोबत वाद झाला होता. रागाच्या भरात कल्पना ही तिची दीडवर्षाची मुलगी प्रतीक्षा या दोघी घरी न सांगता निघून गेल्या. घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली. आज कल्पनाचा पती संतोष पवार (२५) याने देऊळगाव वायसा शिवारात शोधाशोध केली असता जनार्दन श्रीराम बोडखे यांच्या शेतातील विहिरीत कल्पना व मुलगी प्रतीक्षा यांचे प्रेत आढळून आले. लोणारचे ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
माय-लेकीचा मृतदेह आढळला
By admin | Updated: October 17, 2014 00:05 IST