शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

खामगावात तीन तलाक बिल विरोधात मुस्लीम महिलांचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 2:53 PM

खामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरियत प्रोटेक्शन कमिटीवतीने सकाळी ११ वाजता मूकमोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमहिलांचा मुकमोर्चा सकाळी १०.३० वाजता डॉ.जाकीर हुसैन फक्शन हॉल येथून मस्तानचौक, सी.टी.पोलीस स्टेशन मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहचला. आंदोलनकर्त्या महिला १०.४५ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचल्या. त्यावेळी ते उपस्थित राहिले नाहित. त्यानंतर ३० मिनिटानंतर एसडीओ मुकेश चव्हाण हजर झाले.

खामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरियत प्रोटेक्शन कमिटीवतीने सकाळी ११ वाजता मूकमोर्चा काढण्यात आला.केंद्र शासनाने इस्लाम धर्मीयांच्या ‘मुस्लीम पर्सनल ला’ बद्दल मुस्लीम महिला ‘प्रोटेक्शन आॅफ राईटस् आॅन मॅरेज बिल २०१७’ लोकसभेत पारित केले आहे. सद्या राज्यसभेमध्ये ते प्रलंबित आहे. त्यामुळे मुस्लीम समाज अस्वस्थ असून संपूर्ण देशात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन होत आहे. भारतीय संविधानाने अनुछेद १९ अन्वये प्रदान केलेल्या मुलभूत अधिकारानुसार लोकशाही पध्दतीने आणि शांततापूर्ण मार्गाने विरोध दर्शविण्यासाठी शरियत प्रोटेक्शन कमिटी खामगाव महिला विभाग तर्फे २८ मार्च रोजी एसडीओ यांना तलाक बिल २०१७ विरोधात निवेदन देण्यात आले. हे बिल मुस्लीम महिला आणि मुस्लीम मुलांच्या विरोधात असून मुस्लीम समाज व भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. या बिलाचा आम्ही निषेध करतो, असे शरियत प्रोटेक्शन कमिटीने म्हटले आहे. मुस्लीम महिलांना शरियतने सर्व अधिकार दिलेले आहेत. आणि इस्लामी शरियतमध्ये आम्ही सुरक्षित आहोत, असे कमिटीने म्हटले आहे.

महिलांचा मुकमोर्चा सकाळी १०.३० वाजता डॉ.जाकीर हुसैन फक्शन हॉल न.प.प्राथ. शाळा क्रं.२ येथून मस्तानचौक, टिळक मैदान, मेन रोड, महाविर चौक, जनता बैंक, सी.टी.पोलीस स्टेशन मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहचला. महामहिम राष्ट्रपती यांच्या पार्लमेंटमध्ये देण्यात आलेला आपत्तीजनक व्यक्तव्यामधून मुस्लीम महिला हा शब्द काढण्यात यावा व भारत सरकार ही मुस्लीम अल्पसंख्याक समुदायाच्या शरियतमध्ये कोणताही हस्तक्षेप करु नये या दोन मागण्यांचा समावेश आहे.

एसडीओंकडून निवेदन घेण्यास विलंब!उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांना आंदोलनाची पुर्वसुचना दिली होती. आंदोलनकर्त्या महिला १०.४५ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचल्या. त्यावेळी ते उपस्थित राहिले नाहित. त्यामुळे महिलांनी रोष व्यक्त केला. मंत्रालयाच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगून त्यांनी निवेदन घेण्यासाठी येण्याचे टाळले. यावेळी तहसिलदार सुनिल पाटील सुद्धा हजर होते. मात्र आम्हाला निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देणे आहे. असा आग्रह महिलांनी धरला. त्यामुळे प्रशासनाने उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर ३० मिनिटानंतर एसडीओ मुकेश चव्हाण हजर झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव