शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात जन्मठेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:01 IST

पिंपळगाव राजा: भालेगाव येथे चार वर्षांपूर्वी एका युवकाचा  तीक्ष्ण हत्याराने वार करून  निर्घृण खून करण्यात आला होता.  या न्यायप्रविष्ट खटल्याचा २८ सप्टेंबर रोजी खामगाव  न्यायालयाने निकाल देऊन या खून प्रकरणातील चार आरोपीं पैकी एका मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर  तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून झाली होती युवकाची हत्यातिघांची निर्दोष सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव राजा: भालेगाव येथे चार वर्षांपूर्वी एका युवकाचा  तीक्ष्ण हत्याराने वार करून  निर्घृण खून करण्यात आला होता.  या न्यायप्रविष्ट खटल्याचा २८ सप्टेंबर रोजी खामगाव  न्यायालयाने निकाल देऊन या खून प्रकरणातील चार आरोपीं पैकी एका मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर  तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम भालेगाव येथील  एसटी बसस्थानकावर २२ ऑक्टोबर २0१३ रोजी शे. रईस शे.  गणी या युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृणपणे खून  करण्यात आला होता. या खुनाच्या आरोपाखाली शे. मोईन शे.  मुन्शी, शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी, जुबेदाबी शे.  मुन्शी या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या  बहुचर्चित खून प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय  क्र.२ चे न्यायाधीश रा.म. पाथाडे यांच्यासमोर झाली. सरकारी  पक्षाच्यावतीने अँड. आळशी यांनी काम पाहिले.या प्रकरणातील मृतक शे. रईस शे. गणी आणि आरोपी शे. मोईन  शे. मुन्शी, शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी, जुबेदाबी  शे. मुन्शी यांच्यात शेताच्या वादातून जुने वैमनस्य निर्माण झाले  होते. दरम्यान, मृतकाच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग  लावून ती जाळण्यात आली होती. त्यावरून आरोपी व मृतकात  वाद झाला व आरोपीने भालेगाव बसस्थानकावर मृतक शे. रईस  शे. गणी याची निर्घृण हत्या केली होती. त्या खून प्रकरणाचा त पास ठाणेदार आर.ए. तळेकर यांनी करून आरोपीविरुद्ध  खामगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खून  प्रकरणाचा निकाल २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने दिला असून,  मुख्य आरोपी शे. मोईन शे. मुन्शी याला जन्मठेपेची शिक्षा  सुनावली आहे तर शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी,  जुबेदाबी शे. मुन्शी या तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.या बहुचर्चित न्याय प्रविष्ठ प्रकरणाचा ठाणेदार सुरेंद्र अहेरकर व  पोहेकॉ बाळू डाबेराव यांनी पाठपुरावा केला. अखेर गुरुवारी मु ख्य आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्याने मृतकाला न्याय  मिळाला, असे मत या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.  

तिघांची निर्दोष सुटकाया खून प्रकरणाचा निकाल २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने दिला  असून, मुख्य आरोपी शे. मोईन शे. मुन्शी याला जन्मठेपेची शिक्षा  सुनावली आहे तर शे. मोसीन शे. मुन्शी, शे. मतीन शे. मुन्शी,  जुबेदाबी शे. मुन्शी या तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.