शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 15:08 IST

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० करीता पालिका प्रशासनाकडून तयारी केली जात असतानाच, दुसरीकडे शहरातील स्वच्छतेचा विसर पालिकेच्या आरोग्य विभागाला पडला असल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील विविध चौक आणि मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२० करीता पालिका प्रशासनाकडून तयारी केली जात असतानाच, दुसरीकडे शहरातील स्वच्छतेचा विसर पालिकेच्या आरोग्य विभागाला पडला असल्याची जोरदार चर्चा शहरात होत आहे.पावसाळ्याच्या अनुषंगाने विविध साथ रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता, उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून स्वच्छता आणि किटक नाशक फवारणी करण्याचे सुचविले जात आहे. त्याचवेळी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील कचºयाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे.स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत केंद्रीय समितीच्यावतीने खामगाव शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत या सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने खामगाव पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यात. यामध्ये शहराच्या विविध भागासाठी शहर स्वच्छता समन्वयाचीही नियुक्ती केली गेली. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी एक अ‍ॅक्शन प्लानही तयार करण्यात आला. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश असलेल्या स्वच्छतेचाच पालिकेला विसर पडल्याचे चित्र शहरात विविध ठिकाणी दिसून येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहिराती लावण्यात आलेल्या ठिकाणीच कचºयाचे मोठे ढिग साचल्याचे दिसून येते. स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेची कागदोपत्रीस्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत केंद्रीय समितीद्वारे विचारण्यात येणाºया संभाव्य १२ प्रश्नांचे एक पत्रक शहरात वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये संभाव्य प्रश्नांची उत्तरे तयार करून देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणात शहराला जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी शहरातील कचºयाकडे दुर्लक्ष होत असल्याने पालिकेची स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची भूमिका दुटप्पी असल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव