शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिका निवडणूक: ३0९ अर्ज दाखल!

By admin | Updated: October 29, 2016 02:47 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; युती व आघाडीकडे उमेदवारांचे लक्ष.

बुलडाणा/खामगाव, दि. २८- नगरपालिका निवडणुकीत नशीब आजमाविण्यासाठी जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये शुक्रवारी नगराध्यक्ष तसेच नगरसेवकासाठी ३0९ अर्ज दाखल केले. शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शुक्रवारी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडाली. बुलडाणा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ४ जणांनी सहा अर्ज तर नगरसेवकासाठी ७३ अर्ज दाखल करण्यात आले; तसेच देउळगाव राजा येथेही सहा अर्ज दाखल करण्यात आले. घाटाखालील विविध नगरपालिकांमध्ये शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवकांसाठी तब्बल २0९ अर्ज दाखल झाले, तर नगराध्यक्षांसाठी खामगाव नगरपालिका वगळता उर्वरित चार पालिकांमध्ये १५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याकडे अनेकांचा कल राहणार असल्याचे संकेत आहेत.घाटाखालील खामगाव नगरपालिकेतील नगराध्यक्षांकरिता शुक्रवारी २0 अर्ज दाखल झाले; मात्र नगराध्यक्षांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्याचवेळी नांदुरा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक ५८ अर्ज तर नगराध्यक्षांसाठी ६ अर्ज दाखल झाले. मलकापूर पालिकेत नगरसेवक पदासाठी ६0 तर नगराध्यक्षांसाठी ३ अर्ज दाखल झाले. जळगाव जामोद नगरपालिकेतील निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे ४१ तर नगराध्यक्षांसाठी ४ अर्ज तर शेगाव पालिकेत नगरसेवकांसाठी ३0 आणि नगराध्यक्षांसाठी दोन अर्ज दाखल झाले.