शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

‘कोरोना’मुळे बुलडाणा जिल्ह्यातील पालिका आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:14 IST

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाची बाधा पालिकांच्या अर्थकारणालाही बसली आकृती बंधानुसार जिल्ह्यातील पालिकांमधील अनेक पदे ...

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाची बाधा पालिकांच्या अर्थकारणालाही बसली आकृती बंधानुसार जिल्ह्यातील पालिकांमधील अनेक पदे रिक्त असल्याने कोरोना संसर्गाच्या संदर्भाने करावयाच्या अन्य कामाचाही ताण पालिकांवर पडला आहे. त्यातच १४ व्या वित्त आयोगातून पाच ते दहा लाख रुपयांच्या खर्च मर्यादेत पालिकांना कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रारंभी निधी उपलब्ध करण्यात आला होता. मात्र हा निधीही आता संपुष्टात आल्याने पालिकांसमोर आर्थिक समस्या उभ्या ठाकल्या आहेत.परिणामस्वरुप नगर विकास प्रशासनाकडे अनुषंगीक विषयान्वये आता पालिका प्रशासन विभागाकडून निधी उपलब्ध करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे पालिका प्रशासन विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले. सुमारे साडेसहा लाख नागरिक हे जिल्हतील ११ पालिका व दोन नगपंचायती क्षेत्रात राहतात. त्यामुळे या पालिकांवर अतिरिक्त कामाचाही बोजा पडत आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या प्रवेशास आता १३० पेक्षा अधिक दिवस झाले आहे. पालिकास्तरावरील अर्थकारणाला बसलेला फटका आता दृष्टीपथास येत आहे. प्रारंभी कोरोनाचा प्रवेश झाला तेव्हा तो प्रामुख्याने शहरी भागातच झाला. त्यामुळे पालिका प्रशासनावर कामाच्या अतिरिक्त ताणासोबतच प्रतिबंधीत क्षेत्राची रचना, त्यातील छुपे रस्ते बंद करण्यासासोबतच तत्सम कामाचा बोजा पडला होता. प्रारंभी जवळपास ४२ दिवस बॅरिकेटीन प्रतिबंधीत क्षेत्रात ठेवल्या जात होते. त्यानंतर जस जसे बदल होत गेले तस तसे हा कालावधी २८ दिवस त्यानंतर १४ दिवसांच्या आसपास आला. मात्र मार्च, एप्रिल, मे महिन्या दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्रातील बॅरिकेटींग, निर्जंतुकीकरण प्रक्रियेयसह अन्य कामावर मोठा खर्च होत आहे.

२५ ते ३० टक्केच कर वसुलीकर वसुलीच्या नेमक्या स्लॉग ओव्हमध्येच कोरोनाचा शिरकाव शहरी भागात झाला. त्यामुळे मालमत्ता, पाणीपट्टी कर वसुली, शॉपींग कॉम्प्लेक्सचे भाडे, दैनंदिन व आठवडी बाजारातील बैठ्या कराची वसुलीच पुर्णत: ठप्प आहे. जेथे ९० टक्के वसुली होत होती तेथे ती अवघी २५ ते ३० टक्क्यांच्या आसपास झाली. त्यामुळे या स्वायत्त संस्थांना उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत असल्याने कोरोनाचे संकट आता आर्थिक स्वरुपातही उभे ठाकल्याचे चित्र आहे. बुलडाणा पालिका तर जिल्हा मुख्यालयाची पालिका आहे. त्यातच कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यास पालिकेलाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे. त्यामुळे बुलडाणा पालिकेसमोरही अनुषंगीक विषयान्वये समस्या उभी ठाकली असतानाच अंत्यसंस्कार कोठे करायचे या मुद्द्यावरून प्रशासन विरुद्ध नागरिक अशा संघर्षालाही पालिकांना तोंड द्यावे लागतेय.

निधी उपलब्धतेची समस्याप्रारंभी १४ व्या वित्त आयोगातून ब वर्ग पालिकांना दहा लाख व क वर्ग पालिकांना पाच लाख तर नगर पंचायतींना पाच लाख रुपये कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध करण्यात आले होते. हा निधी आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे पालिका निधीतून यासाठी खर्च करावा लागत आहे. शासकीय कार्यालयांचेही निर्जंतुकीकरण पालिकांनाच करावे लागत आहे. त्यामुळे पालिकांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत आहे. त्यातच संग्रामपूर आणि मोताळ््या सारख्या अवघ्या दोन ते तीन वर्षे झालेल्या नगरपंचायतींसमोरतर आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या