शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरांविरूद्ध महावितरणच्या गुरुवारी आकस्मिक धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:37 IST

वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणची सातत्याने कारवाई सुरूच असून बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुरुवारी १२ ऑक्टोंबर२०१७ रोजी महावितरणच्या पथकाने एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता  आढळून आल्यामुळे एकूण २२८ जणांवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यामध्ये २२८ जणांवर कारवाईमोहिमेतील ३७ पथकामध्ये २६१कर्मचा-यांच्या समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणची सातत्याने कारवाई सुरूच असून बुलडाणा जिल्ह्यामध्ये गुरुवारी १२ ऑक्टोंबर२०१७ रोजी महावितरणच्या पथकाने एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर व खामगाव या तिनही विभागामध्ये वीजचोरी व अनियमितता  आढळून आल्यामुळे एकूण २२८ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख २४ हजार १३९ वीजयुनिटची म्हणजे जवळपास १४ लाख ५५ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे,    प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या  निर्देशानुसार  अधिक्षक अभियंता जी.एम. कडाळे  यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते  काकाजी रामटेके, बद्रीनाथ जायभाये व पांडुरंग पवार यांचेसह जिल्ह्यातील अभियंते व जनमित्र  असलेल्या एकूण ४८ पथकांमध्ये २६१ जणांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. या पथकांनी जिल्ह्यातील सर्वच भागातील विविध वर्गवारीच्या ग्राहकांची तपासणी करण्यात आली.वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-यात जिल्ह्यामध्ये ५२ ग्राहक आढळून आले यामध्ये बुलडाणा विभागातील ३२ तर मलकापूर विभागातील २० ग्राहकांचा समावेश होता. तसेच ज्या गावांमध्ये विद्युत वाहिन्यावर आकोडे/हुक टाकून वीज चोरी करण्यावर पथकानी कारवाई केली,यामध्ये  बुलडाणा विभाग ५३, खामगाव विभाग ७० तर मलकापूर विभाग २० जण आढळले. यांचेवर  भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच जवळपास ८१ ठीकाणचे आकोडे काढण्यात आले तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे ११ ग्राहक आढळून आले त्यांचेवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली. संपूर्ण कारवाईमध्ये १ लाख २४ हजार १३९ वीजयुनिटची म्हणजे जवळपास १४ लाख ५५ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीसुद्धा  जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये अनेक ग्राहकांवर कारवाई करण्यात आली होती . वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामूहिकरीत्या सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता जी.एम. कडाळे यांनी केले आहे.