शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जागतीक आदिवासी दिनानिमित्त रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:51 IST

लोणार : ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाच्या सर्वच पक्षाच्या, संघटनेच्या पदाधिकारी व शासकीय  कर्मचारी तसेच महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

ठळक मुद्देरॅलीमध्ये सर्व आदिवासी समाज बांधवांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाच्या सर्वच पक्षाच्या, संघटनेच्या पदाधिकारी व शासकीय  कर्मचारी तसेच महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.राज्यात ९ आॅगस्ट हा दिन जागतिक आदिवासीदिन म्हणून साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण आमसभेच्या ठरावाद्वारा ९ आॅगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून जाहिर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने हा दिन राज्यातही ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान कोकाटे यांच्या नेतृत्वात ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाच्या सर्वच पक्षाच्या, संघटनेच्या पदाधिकारी व शासकीय  कर्मचारी तसेच महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. आदिवासी उपयोजना क्षेत्र व बिगर आदिवासी उपयोजना क्षेत्रात रोजगाराच्या संधी, शेती विषयक योजना, आरोग्य व पोषण विषयक योजनांची माहिती, वन उत्पादने व शेतीमाल यावर आधारित उद्योग याबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. आदिवासींच्या विकासाकडे आणि त्यांच्या सुविधांकडे शासनाने सातत्याने लक्ष घालावे व समाजाचे जीवनमान उंचवावे. आदिवासी बांधवाना सुविधा पुरवण्याची जबाबदारी प्रामुख्याने शासनाने पूर्ण करावी. आदिवासींसाठी असलेला विकास निधी हा त्यांच्यापर्यंत पोहचता करावा, यासाठी शासन दरबारी आपला लढा कायम राहील असे प्रतिपादन  ९ आॅगस्ट  रोजीच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्या गोदावरी कोकाटे यांनी केले. यावेळी माजी पं.स.सभापती ज्ञानेश्वर चीभडे, पं.स.विस्तार अधिकारी माधव कोकाटे, नामदेवराव कोकाटे, विष्णू तनपुरे,  तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोकाटे, आश्रुबा कोकाटे, धोंडू कोकाटे, निवृत्ती धोत्रे, पंढरी कोकाटे, संतोष राऊत , पंढरी फुपाटे , बबन तनपुरे, रामेश्वर घाटे, रामेश्वर इंगळे, बबन कोकाटे, नारायण जाधव, मदन धोत्रे, उद्धव कोकाटे, सुभाष गोदमले, वासुदेव जटाळे , पोलीस पाटील पंढरी फुपाटे यांचेसह हजारो समाजबांधव ब महिलांची उपस्थिती होती.