राजमाता माँ जिजाऊ यांच्या चिखली येथील मेहकर फाटास्थित पुतळ्याला १२ जानेवारी रोजी आ. श्वेता महाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ म्हणूनच मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याची ओळख देशभरात होते. याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचेही यावेळी आ. महाले यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, अॅड. मंगेश व्यवहारे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, शेख अनिस शेख बुढण, नगरसेवक गोविंद देव्हडे, गोपाल देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, विजय नकवाल, रघुनाथ कुलकर्णी, नामू गुरुदासानी, सतीश खबुतरे, अनुप महाजन, सुदर्शन भालेराव, नारायण भवर, सचिन कोकाटे, अनमोल ढोरे, भारत दानवे, नितीन गोराडे, सिद्धेश्वर ठेंग, सुरेश इंगळे, चंद्रकांत काटकर, यश टिपारे, शंकर देशमाने, शैलेश सोनुने, सचिन शेटे, रमीज राजा, परमानंद खंदारे, डी.एस. शिंदे, बी.बी. धांडे यांची उपस्थिती होती.
माँ जिजाऊंची शिकवण प्रेरणादायी : आ. श्वेता महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST