शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

वादळी वारा व गारपिटीने संग्रामपूर, नांदुरा, खामगावात सर्वाधिक नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:21 IST

खामगाव : घाटाखालील नांदुरा, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात वादळी वारा व गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले आहे.  गारपिटीचा तडाखा खामगाव मतदारसंघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. 

ठळक मुद्देआमदार आकाश फुंडकर यांनी केली गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घाटाखालील नांदुरा, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात वादळी वारा व गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले आहे.  गारपिटीचा तडाखा खामगाव मतदारसंघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी विदर्भात गारपीट होण्याबाबत हवामानाचा अंदाज वर्तविला होता.  सकाळी खामगाव मतदारसंघातील खामगाव व शेगाव तालुक्यातील काही भागात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली.  त्यामुळे गहू, हरभरा इत्यादी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  ही माहिती समजताच  आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी मतदारसंघातील रोहणा, कोन्टी, वर्णा, नांद्री, काळेगाव, ढोरपगाव, कवडगाव, बेलखेड आदी गावांचा तातडीने दौरा करून गारपीटग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहसीलदार सुनील पाटील, जि. प. सभापती डॉ. गोपाल गव्हाळे,  तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, उपसभापती भगवानसिंह सोळंके, शत्रुघ्न पाटील, लाला महाले, समाधान मुंढे, तालुका सरचिटणीस शांताराम बोधे, हरसिंग साबळे व कृषी विभागाचे अधिकारी व कृषी सहायक उपरोक्त गावाचे तलाठीदेखील उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांना धीर दिला. 

रब्बी पिकासह फळबागांचे नुकसान, शेतमजूर जखमी वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह गारपीट मोठय़ा प्रमाणात झाली. त्यात रब्बी  पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये हरभरा, गहू, भाजीपाला, कांदा, टरबूज, मिरची, मका आदी पिकासह संत्रा आदींचा समावेश आहे. वादळी वार्‍यानेबावनबीर येथील शाळेची टिनपत्रे उडाली. संग्रामपूर येथील तहसीललगत टपर्‍या उडाल्या. आलेवाडी येथील घरावरची टिनपत्रे उडाली.तालुक्यातील झालेल्या गारपिटीमध्ये पातुर्डा बु. सोनाळा, लाडणापूर, बावनबीर आदी गावातील फळबाग उत्पादक शेतकर्‍यांचे लिंबू, संत्र्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. संजय ढगे यांच्यासह बावनबीर लाडणापूर येथील विजय हागे आदी  शेतकर्‍याच्या शेतातील टरबूज पीक उद्ध्वस्त झाले. तालुक्यातील आदिवासी भागातील सायखेड आलेवाडी सोनाळा, चिचारी, लाडणापूर या परिसरातील टमाटे, मिरची, गहू, कांदा, खरबूज, टरबूज, हरभरा, संत्रा, लिंबूचे सर्वाधिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची आमदार संजय कुटे यांनी तातडीने पाहणी करून महसूल व कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश दिले आहेत. 

संयुक्त सर्व्हे करा - सुनील पाटीलसर्व मंडळ अधिकार्‍यांना त्यांच्या मंडळातील गारपीट नुकसानाचा सर्व्हे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी व कृषी सहायक मिळून गारपीट नुकसानाचा सर्व्हे करायचा आहे, अशा सूचना जिल्हा कृषी अधीक्षक बुलडाणा यांनी दिल्या आहेत. कुणाला लेखी पाहिजे असल्यास त्या संबंधित कर्मचार्‍यांनी ऑफिसमधून पत्र घेऊन जावे किंवा या संदेशाचा संदर्भ देऊन सर्व्हे सुरू करावा.             

गारपिटीमुळे जखमी शेतमजुरावर खासगी रुग्णालयात उपचार लाडनापूर येथील शेतमजुू सागर गजानन अगळते, दीपक सपकाळ, शांताराम रामकृष्ण सोनोने, रवींद्र सोनोने रा. लाडणापूर या शेतकर्‍याची तूर काठणाचे काम सुरू अचानक वादळी वार्‍यासह आलेल्या गारांनी झोडपून काढले तर पातुर्डातील शेतकरी गजानन दाभाडे, गजानन राहाटे हे शेतात पर्‍हाटी उपटत असताना गारांच्या मार्‍यामुळे जखमी झाले, त्यामुळे जखमी शेतमजुरावर उपचार करण्यासाठी शेतकरी, नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जळगाव जामोद : प्रचंड गारपीट, पिकांची हानीरविवारी सकाळी संग्रामपूर तालुक्यात झालेल्या प्रचंड गारपिटीने पिकांची मोठी हानी झाली असून, वादळी वार्‍याने आदिवासी गावातील घरांच्या छताचे नुकसान झाले आहे. या अकस्मात झालेल्या गारपिटीने शेतकरी हारदला असून शेतमालाची लाखोंची हानी झाली आहे. या भागाला तातडीने आ.डॉ. संजय कुटे व पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी भेटी देऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. आ.डॉ. संजय कुटे यांनी प्रशासनाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देशसुद्धा दिले. 

टॅग्स :khamgaonखामगाव