शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेशासाठी जागेपेक्षा अर्ज जास्त

By admin | Updated: June 30, 2017 00:29 IST

१५ हजार ५६ विद्यार्थ्यांचे अर्ज : अर्जदारांचे ड्रॉ बाकीच!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आरटीई अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पश्चिम विदर्भात १० हजार ८०६ जागा असून, त्यासाठी १५ हजार ५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते; मात्र मोफत प्रवेशासाठी जागेपक्षा अर्ज जास्त आलेले असतानाही व शाळा सुरू होऊनही अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ड्रॉची प्रक्रिया बाकीच आहे. शिक्षण हक्क कायद्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून देण्यात आले आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याकरिता आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये राबविण्यात आली; परंतु शाळा सुरू होऊनही ही प्रक्रिया अपूर्णच आहे. अमरावती विभागामध्ये १० हजार ८०६ जागेसाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत असून, याचा लाभ घेण्यासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून १५ हजार ५६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरावर ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेश पक्रिया राबविण्यात आली; मात्र मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे ड्रॉ काढण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध अडचणी येत असल्याने अनेक प्रवेश अद्यापही बाकी आहेत. मोफत प्रवेशासाठी अमरावती विभागातून १५ हजार ५६ अर्ज आले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून २ हजार २८५ अर्ज, अकोला जिल्ह्यात ३ हजार ४६७ , अमरावती जिल्ह्यात ५ हजार ३६०, वाशिम जिल्ह्यात ७५१ व यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार १९३ अर्ज आलेले आहेत. २७ जूनला शाळा सुरू झाल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यात केवळ दोनच ड्रॉआरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच वेळेस ड्रॉ काढण्यात आले; परंतु इतर जिल्ह्यांमध्ये पाच ते सहा वेळेस ड्रॉ काढून मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला; मात्र बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया अपूर्ण असूनही ड्रॉ काढण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.