शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोराच्या शिकारीची चौकशी सुरु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 23:15 IST

वन विभागाने अज्ञात विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अभयारण्याच्या परिसरात गस्त वाढविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : वन्य जीव अभयारण्यात मोराची शिकार करून पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार १८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला होता. या गैरप्रकाराची बातमी ह्यलोकमतह्ण मध्ये १९ जुलै रोजी प्रकाशित होताच वन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. याप्रकरणी वन विभागाने अज्ञात विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अभयारण्याच्या परिसरात गस्त वाढविली आहे. लोणार येथे वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी वन विभागाकडून अनेक दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून वारंवार देण्यात येत असतात; मात्र स्थानिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे या अभयारण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोणार अभयारण्यात शिकार करून पार्टी केल्या जात असल्याचे भयावह चित्र १७ जुलै रोजी समोर आले. १८ जुलै रोजी सकाळी अभयारण्याच्या भोवती अनेक नागरिक पायदळ चकरा मारीत असताना त्या नागरिकांना अभयारण्यातच किन्ही रोडपासून अवघ्या काही अंतरावर सरोवराच्या काठावर दोन चूल आढळून आल्या. एवढेच नव्हे, तर या ठिकाणी कागदाच्या पत्रावळय़ांवर आरोपींनी पार्टी केल्याचे आढळून आले. ही बातमी वार्‍यासारखी शहरात पसरताच वन्य प्रेमींनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, या ठिकाणी चूल पेटवून मेजवानी घेतल्याचे आढळून आले. या घटनेमुळे वन्य प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत लोकमतमध्ये १९ जुलै रोजी बातमी प्रकाशित होताच वन विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून, त्यांनी गस्त वाढविली आहे. वन विभाग सक्रिय झालालोणार वन्य जीव अभयारण्यात झालेली मोराची शिकार, टिटवी शिवारात झालेला बिबट्याचा संशयास्पद मृत्यू याने वन विभाग सक्रिय झाला असून, अभयारण्याच्या नियमांची अंमलबजावणी सुरु झालेली दिसून येत आहे.लोणार सरोवराच्या काठाने आता चार चाकी व दुचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. किन्ही रस्त्याजवळील प्रवेशद्वार वाहनांसाठी आता कायम बंद असेल. या ठिकाणी आता २४ तास गार्ड असेल. प्रत्येक पर्यटक व भेट देणारांची नोंद घेतली जाईल.- लक्ष्मण पाटील, सहायक वनसंरक्षक,मेहकर.