शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात ‘मनी पॉवर’ भारी ठरते

By admin | Updated: October 2, 2014 23:36 IST

निष्ठावान दुरावले : रोजंदारीच्या कार्यकर्त्यांवरच प्रचाराची मदार.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ ११ दिवस उरले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये प्रचाराचे संदर्भही बदलले आहेत. निष्ठावान कार्यकर्ता घरी बसलेला आहे, तर प्रचाराची धुरा भाडोत्री कार्यकर्ते सांभाळत आहेत. बहुतेक मतदारसंघांत उमेदवारांचे नातेवाईक प्रचाराचा भार वाहताना दिसत आहेत. सध्याच्या राजकारणात निष्ठा, विचार आदींची वाट लागली आहे. केवळ मनीपॉवरचा बोलबाला आहे. भाडोत्री कार्यकर्त्यांची चंगळ आहे. दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत आहे. रॅली, प्रचारसभांसाठी रोजंदारीने कार्यकर्ते गोळा केले जात आहेत. नवख्या उमेदवारांसाठी हे वातावरण अडचणीचे आहे. सभा व रॅलींमध्ये ह्यपेडवर्कर्सह्ण चा बोलबाला आहे. प्रचारासाठी कमी दिवस उरल्याने कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे. प्रचारासाठी फिरल्यानंतर जेवणाची सोयदेखील उमेदवारांना करावी लागत आहे. अनेकांनी साडी-चोळी, कुणी दिवाळीचा किराणा आदींची आमिषे दाखिविली आहेत. प्रचाराच्या नव्या ट्रेंडमध्ये सच्चा कार्यकर्ता दुरावला जात आहे.        कमी दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असल्याने ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांंची आयात करण्याचे सत्र सुरू आहे. निवडणुकीच्या कार्यात चहा, नाश्ता, जेवण आणि भरपूर भत्ता, शिवाय मतदारसंघात फिरण्यासाठी वाहनांची सोय असल्याने ग्रामीण भागात शे तीच्या कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. युती-आघाडी कायमच राहणार, हे गृहीत धरून ज्या उमेदवारांनी प्रचार साहित्य तयार केले त्यांच्यावर हे साहित्य फेकून देण्याची वेळ आली; पण निवडणूक लढवायची तर पुन्हा प्रचार साहित्य तयार करणे आलेच. त्यामुळे यंदा प्रचार साहित्याची विक्री करणार्‍या दुकानदारांचा दुप्पट लाभ झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खर्‍या अर्थाने वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून वरिष्ठ नेत्यांच्या आणि स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामान्य जनतेचे या आरोप-प्रत्यारोपांमधून भरपूर मनोरंजन होत आहे, हा भाग वेगळा.