शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अनुराधा फार्मसीच्या मोहसीन शेखची 'कॉग्निझंट'साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

अनुराधा फार्मसी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह शिक्षणापश्चात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी 'ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट' विभाग कार्यरत आहे. या ...

अनुराधा फार्मसी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह शिक्षणापश्चात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी 'ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट' विभाग कार्यरत आहे. या विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मोहसीन शेख याची निवड झाली आहे. संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयांत ट्रेनिंग प्लेसमेंटअंतर्गत विविध कंपन्यांच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन सातत्याने करण्यात येते. या विभागाचे मुख्य समन्वयक प्रा. यु. एम. जोशी यांच्या पुढाकारातून यावर्षी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी देश - विदेशातील फार्मसी क्षेत्रामध्ये उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऑनलाईन वेबिनारच्या मदतीने विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विविध कंपन्यांशी करार केला आहे. उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांकडून फार्मसी उद्योगातील नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योग्यवेळी योग्य संधी प्राप्त होत असून, आज देश-विदेशात अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवित आहेत. ही गौरवाची बाब असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बियाणी यांनी व्यक्त केले आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, सचिव राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. व्ही. आर. यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे, सलिमोदीन काझी, अनंतराव सराफ, आत्माराम देशमाने, प्राचार्य डॉ. बियाणी, डॉ. काळे, डॉ. पागोरे, प्रा. जोशी, डॉ. उप्पला मोहन कुमार, प्रा. पवन फोलाने व प्राध्यापकवृृंदांनी समाधान व्यक्त केले आहे.