शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मोदी सरांची ‘शाळा’ भरली !

By admin | Updated: September 6, 2014 01:18 IST

लोकमत सर्वेक्षण : बुलडाणा जिल्ह्यातील शाळांनी रेडिओ, टीव्ही अन् मोबाईलवरूनही ऐकविले पंतप्रधानांचे बोल

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी केलेला आटापिटा अखेर यशस्वी झाला. एक दोन अपवाद वगळले तर प्रत्येक शाळेत मोदी सरांची ह्यशाळाह्ण भरली. कुठे रेडिओ, कुठे उसनवारीचा टीव्ही तर कुठे चक्क मोबाईलमधील लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातुन पंतप्रधानांचा आवाज गुंजला. ह्यलोकमतह्ण ने आज जिल्हाभरातील निवडक शाळांमध्ये सर्व्हेक्षण केले असता शिक्षण विभागाची कवायत सफल झाल्याचे दिसुन आले. बुलडाणा, मोताळा, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेहकर, लोणार तालुक्यातील ३५ गावातील ४६ शाळावर जावून लोकमत चमुनी सर्व्हेक्षण केले असता २ ठिकाणी मोबॉईलवर, ४ ठिकाणी रेडिओवर, ४ ठिकाणी एलसीडी प्रोजेक्टरवर तर २ ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय एका कृषी केंद्रात एका ठिकाणी मंदिराच्या सभागृहात तर ५ ठिकाणी पालकांच्या घरी नेवून विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकावे लागले. घाटाखालील खामगावसह शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जा., संग्रामपूर या ६ तालुक्यातील ६४ गावांमध्ये एकूण ९१ शाळांमध्ये लोकमतच्या वार्ताहरांकडून याबाबत सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण ७८ शाळांमध्ये दूरदर्शन संचावरुन, २ ठिकाणी प्रोजेक्टरवरुन, ६ ठिकाणी गावातील पालकांच्या घरी, 0२ ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये तर व्यवस्था नसल्याने 0६ ठिकाणी रेडिओव्दारे तर 0३ ठिकाणी मोबाईलवरुन संभाषण ऐकविण्यात आले.विशेष म्हणजे पंतप्रधानांचे भाषण हिंदीत असल्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना भाषणच समजले नाही. विद्यार्थी केवळ टीव्ही समोर बसून होते. बुलडाणा तालुक्यातील मातला, सिंदखेड, रायपूर, चांडोळ, खेर्डी येथील शाळेत दुरचित्रवाणी संच उपलब्ध करून दिले होते. तर इरला येथील जि.प शाळेत केबल कनेक्शन नसल्यामुळे मंदीराच्या सभागृहात बसून विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले.शरद पवार हायस्कुल चांडोळ येथे रेडिओ विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला होता. हा रेडिओसुद्धा बंद होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना भाषण ऐकता आले नाही. मोताळा तालुक्यातील ९ शाळांमध्ये लोकमत चमूने भेट देऊन पाहणी केली असता यामध्ये ब्राम्हंदा, खांडवा, मोताळा, बोराखेडी, आडविहीर येथील शाळांमध्ये दूरचित्रवाणी संचाची व्यवस्था करण्यात आली होती. लिहा येथील जगदंबा विद्यालयात विद्यार्थ्यांना रेडिओवर भाषण ऐकावे लागले.येथील शाळेत विद्युत पुरवठा नव्हता व केबल कनेक्शनसुध्दा नव्हते. देऊळगावराजा तालुक्यातील पाच शाळांची पाहणी केली असता केबल कनेक्शन नसल्यामुळे सावखेड भोई येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये बसवून पंतप्रधानाचे भाषण दूरचित्रवाणीवर पहावे लागले. येथे ७0 विद्यार्थी उपस्थित होते. बायगाव बु.येथेसुद्धा शाळेत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बसून भाषण ऐकावे लागले. औंढेश्‍वर विद्यालय अंढेरा येथे विद्यार्थ्यांंना एकत्र बसून प्रोजेक्टरवर भाषण दाखविण्यात आले. यशवंत माध्यमिक विद्यालय डिग्रस बु. जि.प. उर्दू हायस्कूल आणि शिवाजी विद्यालय दे.मही येथे विद्यार्थ्यांना रेडिओवर भाषण ऐकावे लागले. या रेडिओचासुद्धा आवाज येत नसल्यामुळे गोंधळातच मोदीचे भाषण संपवावे लागले. दे.मही येथे दूरचित्रवाणी संच होता; मात्र ऐनवेळी चित्र दिसले नसल्याने व्यत्यय आला, त्यामुळे रेडिओ बोलवावा लागला होता. चिखली तालुक्यातील पाच गावातील शाळेची पाहणी केली असता कारखेड येथील जि.प.शाळेत टि.व्ही. नसल्यामुळे पोलिस पाटील यांच्या घरी तर सिंदी हराळी येथील जि.प.च्या शाळेत विद्युत पुरवठा नसल्यामुळे शाळा समितीच्या अध्यक्षाच्या घरी विद्यार्थी बसलेले होते. तर इसोली, धानोरी, सोमठाणा, शेलुद येथील शाळामध्ये शिक्षकांनी टी.व्ही.ची व्यवस्था करून दिली होती. मेहकर तालुक्यातील चार तर लोणार व सिंदखेडराजा तालुक्यातील दहा शाळेत भाषण ऐकण्यासाठी साधनाची व्यवस्था करून दिल्याचे आढळून आले. काही शाळेत विद्युत पुरवठा नसल्याने पंतप्रधानांचे भाषण ऐकविण्यासाठी शिक्षकांना कवायत करावी लागली. मेहकर तालुक्यातील सोनारगव्हाण जि.प.शाळेत ३0 विद्यार्थी मोदींच्या भाषणाला हजर होते. शाळेत विद्युत पुरवठा नसल्यामुळे शेजारच्या उर्दू शाळेतील दुरदर्शन संचावर विद्यार्थ्यांंना भाषण ऐकविले. लोणार तालुक्यातील राजणी जि.प.शाळेत थकीत वीज बिलामुळे तब्बल ३ वर्षापासून शाळेतील विद्युत पुरवठा बंद आहे. तसेच दुरदर्शन संचही उपलब्ध नव्हता. त्यामुळे मुख्याध्यापक संजय घुले यांनी ग्रामस्थ श्रीराम अवचार यांच्या घरच्या दुरदर्शन संचावर विद्यार्थ्यांंना भाषण ऐकविले. ** मोबाईलवरून भाषण मेहकर तालुक्यातील राजगड आणि सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये पंतप्रधानाचे भाषण ऐकण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध होऊ न शकल्यामुळे शिक्षकांनी चक्क मोबाईलवरून विद्यार्थ्यांंना पंतप्रधानांचे भाषण ऐकविले. राजगड येथे १ ते ४ पर्यंंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथे २७ विद्यार्थी हजर होते. येथील शाळेत विद्युत पुरवठा होता परंतु दुरदर्शन संच उपलब्ध नव्हता.त्यामुळे मुख्याध्यापक संतोष किसनराव कुबडे यांनी त्यांच्या मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांंना भाषण ऐकविले. तर तढेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ७५ विद्यार्थी हजर होते. शाळेत विद्युत पुरवठा आहे, परंतु दुरदर्शन संच उपलब्ध नव्हता. त्यामुळे मुख्याध्यापक आर.बी.काळुसे यांनी मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांंना भाषण ऐकविले. ** २ शाळा आढळल्या कुलूपबंद संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम शेंबा व गुमटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा आज शिक्षक दिनी कुलूप लावलेल्या आढळल्या. त्यामुळे या शाळांमध्ये सदर प्रक्षेपण दाखविण्यात आले नाही. तर आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुध्दा साजरा झाला नाही. येथील शिक्षकांनी आज शाळांना दांडी मारुन शिक्षक दिनाचा आनंद साजरा केला. रेडिओवरुन भाषणगोत्रा जि.प.शाळेत आज १९७ विद्यार्थी मोदींच्या भाषणाला हजर होते. शाळेत विद्युत पुरवठा आहे परंतु दूरदर्शन संच उपलब्ध नव्हता. त्यामुळे मुख्याध्यापक सरदार शहा यांनी रेडिओद्वारे विद्यार्थ्यांंना भाषण ऐकविले. तसेच गोरेगाव जि.प. शाळेत दूरदर्शन संच आहे; परंतु थकीत वीज बिलामुळे शाळेतील विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे मुख्याध्यापक वसुदेव पंचाळ यांनी रेडिओवर विद्यार्थ्यांंना भाषण ऐकविले. दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यात पाऊस सुरू असल्यामुळे कोठे एकत्र बसण्यासाठी जागा कमी पडत असल्यामुळे तर कोठे पावसामुळे विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात व्यत्यय आल्याचे दिसून आले.