शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:55 IST

बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.

ठळक मुद्देखासदार राजू शेट्टी यांचा आरोपदेशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. येथील पत्रकार भवनात १४ ऑगस्ट रोजी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना खा. शेट्टी  म्हणाले, की लोकसभा निवडणूक काळात एनडीएचे  उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध  आश्‍वासने दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव  देण्यात येईल, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी  करण्यात येईल आदी आश्‍वासनांचा त्यात समावेश होता.  मात्र निवडणुकीनंतर त्यांनी शेतकर्‍यांना कोणत्याच  प्रकारचा न्याय दिला नाही. देशात दाळवर्गीय उत्पादन  वाढले असताना परदेशातून डाळ आयात करण्यात आली.  या धोरणामुळे शेतकर्‍यांना बाजार भाव मिळाला नाही.  राज्यातही शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन  देण्यात आले होते. मात्र कर्जमाफी करताना विविध अटी  लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना  न्याय मिळाला नाही. यावर्षी पाऊस नसल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यावर  दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  दिलास द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्या  सरकार दरबारी मांडाव्यात यासाठी विदर्भाचा दौरा आयोजि त केला आहे. यावेळी कर्जमाफीच्या अटी मान्य नाहीत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून न्याय  द्यावा, या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे  खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग  महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, गजानन पाटील बंगाळे, मयूर बोर्डे आदी उ पस्थित होते. 

देशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांना देशव्यापी स्तरावर न्याय  मिळण्यासाठी अखील भारतीय किसान समन्वय समितीच्या  माध्यमातून देशातील विविध भागातील १६0 शेतकर्‍यांच्या  संघटना एकत्र येणार आहेत. येणार्‍या हिवाळी  अधिवेशनादरम्यान अखील भारतीय किसान समन्वय समि तीच्या माध्यमातून १0 लाख शेतकरी एकत्र येणार आहेत.  अशा चळवळीच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येणे  आवश्यक असल्याचेही खा. राजू शेट्टी यांनी सांगि तले.याचवेळी राज्यातील सत्तेत सहभाग ही केवळ औ पचारिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.